• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • शाळेत जाताच शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली, सर्जरीची आली वेळ!

शाळेत जाताच शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली, सर्जरीची आली वेळ!

तब्बल 20 महिन्यांनंतर शाळेत गेल्यामुळे विद्यार्थी आनंदात उड्या मारू लागला होता. मात्र..

 • Share this:
  कलकत्ता, 20 नोव्हेंबर : पश्चिम बंगालमधील (West Bengal) हुगळी जिल्ह्यामधून एक धक्कादायक (Shocking News) वृत्त समोर आलं आहे. येथील उत्तरपाडामधील अमरेंद्र विद्यापीठातील शिक्षकाला विद्यार्थ्याचा आनंद सहन झाला नाही आणि त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्याच्या कानशीलात लगावली. कोरोना काळात शाळा बंद होते. गेल्या काही दिवसांपासून हळूहळू सर्व ठिकाणी शाळा (School) सुरू होत आहे. 20 महिन्यांनंतर पुन्हा शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थी मधल्या सुट्टीत साजरा करीत होता. यावर शिक्षकाने संताप व्यक्त केला. (student rejoiced as soon as he went to school teacher slapped the student) विशेष म्हणजे विद्यार्थी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करून ऑफिसच्या बाहेर पडत होता, तोच रागाच्या भरात शिक्षकाने पुन्हा विद्यार्थ्याच्या कानशीलात लगावली. यानंतर विद्यार्थ्याला कानाच्या खालच्या बाजूला वेदना होऊ लागल्या. घरी गेल्यावर त्याने आई-बाबांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पालक त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. हे ही वाचा-रक्तरंजित संध्याकाळ! माहेरी आलेल्या मुलीला घराबाहेर बोलावून घातल्या गोळ्या सर्जरी करण्याची भासू शकते गरज.. डॉक्टरने पीडिता विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर 6 ते 8 आठवड्यांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्याचा सल्ला दिला. यानंतर त्याला कानावर शस्त्रक्रिया करण्याची शक्यता पडू शकते. या प्रकरणानंतर पीडित विद्यार्थ्याच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेत शिक्षक गौतम रूईदास याने दहावी कक्षाच्या विद्यार्थ्याला दोन वेळा कानशीलात लगावली. पहिल्यांदा मारल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने  मुख्याध्यापकाकडे तोंडी तक्रार केली. त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कानशीलात लगावली. या प्रकरणात संबंधित शिक्षकाने सांगितलं की, त्याला विद्यार्थ्याला मारण्याचा हेतू नव्हता. शिवाय त्यांचं विद्यार्थ्यासोबत काही शत्रूत्व आहे. त्यांनी मुलाला अनुशासनचं पालन करण्यास सांगितलं होतं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: