मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बुलढाणा : पेपर सुरू होण्याआधी बीकॉमच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; वर्गखोलीत घेतला अखेरचा श्वास

बुलढाणा : पेपर सुरू होण्याआधी बीकॉमच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; वर्गखोलीत घेतला अखेरचा श्वास

पेपर सुरू होण्याआधी बीकॉमच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल

पेपर सुरू होण्याआधी बीकॉमच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल

बुलढाणा जिल्ह्यात बी. कॉमच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ माजली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

राहुल खंडारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 1 फेब्रुवारी : बुलढाणा जिल्ह्यात बी. कॉमच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या वर्गखोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात बीकॉमच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणारा वीस वर्षीय विद्यार्थी सुरज गावंडे याने पेपर सुरू असताना एका वर्ग खोलीत रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

या विद्यार्थ्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, बीकॉमच्या प्रथम सत्राची सद्या परीक्षा सुरू आहे. या परीक्षेदरम्यान या विद्यार्थ्याने आत्महत्या करून एकच खळबळ माजवून दिली आहे. आज बीकॉम प्रथम वर्षाचा अकाउंट या विषयाचा पेपर होता आणि पेपर सुरू होण्याआधीच या विद्यार्थ्यांना एका वर्ग खोलीत आत्महत्या केली आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील ही घटना आहे. वर्ग खोलीत विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक टाकण्याचे काम सुरू असताना महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना हा विद्यार्थी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्याला खाली घेऊन जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

वाचा - 2 मुलांची आई माहेरचं कारण सांगून निघाली अन् सापडली हॉटेलमध्ये, अस फुटलं बिंग

पोलिसांकडून तपास सुरू

सदर विद्यार्थी मितभाषी आणि मनमिळावू होता. कॉलेजमध्येही त्याचे सर्वांशी चांगले संबंध होते. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोदचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर भास्कर, पोलीस उपनिरिक्षक नारायण सरकटे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मनोज खुंटे आणि पोलीस शिपाई सुरज गवई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असल्याने अभ्यासाचा ताण आहे की आणखी काही याची कुजबूज सध्या सुरू आहे. मृत सुरज याचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तसास जळगाव जामोदचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक मनोज खुंटे करत आहेत.

First published:

Tags: Buldhana, Crime