वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 30 जून : पुण्यात इंजिनियरींग कॅालेजच्या शिक्षिकेला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. मात्र, हा विद्यार्थी पश्चिम बंगालमध्ये बसून महिला शिक्षिकेला 5 हजार अमेरिकन डॅालर मागून ब्लॅकमेल करत होता. काय आहे प्रकरण? हडपसरमधल्या इंजिनियरिंग कॅालेजच्या शिक्षिकेला विद्यार्थ्यांसोबत ठेवलेली मोकळी वागणूक भलतीच महाग पडली. मयांक सिंग नावाच्या विद्यार्थ्यासोबत व्हिडीओ कॅालवर 2 वर्षांपूर्वी केलेल संभाषण व्हायरल करण्याची धमकी देत 5 हजार अमेरिकन डॅालरची मागणी करण्यात आली. या शिक्षिकेच्या पतीला हा व्हिडीओ पाठवूनही पैशानी मागणी करण्यात आल्याने शिक्षिकेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मयांक सिंग हा विद्यार्थी 2 वर्षांपूर्वी हडपसर येथे इंजिनियरिंग कॅालेजला शिकायला होता. त्यावेळी फिर्यादी शिक्षिका या आरोपीला शिकवायला होत्या. वेगवेगळ्या कारणाने आरोपी या शिक्षिकेला व्हिडीओ कॅाल करत होता. दोन वर्षांपूर्वी तो गावी निघून गेला होता. अचानक 2 वर्षांनी त्याने शिक्षिकेला आणि तिच्या पतीला फोन करुन न्यूड व्हिडीओ पाठवून धमकावायला लागला होता. त्याने 5 हजार अमेरिकन डॅालरची मागणी केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. या एका व्हिडीओ कॅालच्या धमकीने शिक्षिकेच कुटुंब उध्वस्त व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमधून बोध घेण्याची आवश्यकता आहे. वाचा - पुण्यात कोयता गँगचा उच्छाद! पोलिसांनी असा मोडला माज, पाहा PHOTO पुण्यात गुन्हेगारी वाढली काही दिवसांपूर्वी पुण्यात सेक्सटॉर्शनला बळी पडून 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. व्हॉट्सअॅपवरुन एका अनोळखी महिलेसोबत झालेल्या ओळखीतून त्याचा न्यूड व्हिडीओ शूट करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणाने हे पाऊल उचललं. या घटनेनंतर शहरातील एका 64 वर्षीय वृद्धाला न्यूड व्हिडीओ कॉल करुन न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले आहेत.
काय आहे सेक्स्टॉर्शन? तरुण आणि धनाढ्य व्यक्तींना गाठून फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जाते. या टोळीतल्या तरुणींना अश्लील बोलायला तयार केलेलं असतं. वेगवेगळ्या नंबरवरुन हा व्हिडिओ कॉल केला जातो. ओळख होताच तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करते. समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढायला लावले जातात. ज्याला जाळ्यात ओढायचं त्याला बोलायला भाग पाडून रेकॉर्डिंग केलं जात आणि त्यानंतर खंडणी मागण्यास सुरुवात होते. खंडणीची रक्कम बनावट खात्यात मागवली जाते.

)







