घरात वाहत होता रक्ताचा पाट; आई, वहिनी, भाचीला सुऱ्याने भोसकलं नंतर स्वत:च्या गळ्यावर फिरवला सुरा

घरात वाहत होता रक्ताचा पाट; आई, वहिनी, भाचीला सुऱ्याने भोसकलं नंतर स्वत:च्या गळ्यावर फिरवला सुरा

घरात सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून...

  • Share this:

पाटना, 8 ऑक्टोबर : बिहारमधील गोपालगंज येथील एका तरुणीने धक्कादायक कृत्य केलं आहे. या तरुणाने पहिल्यांदा आपली आई, वहिनी, भाची यांच्यावर चाकूने हल्ला केला. यानंतर शेजारी राहणाऱ्या आई व तिच्या मुलीलाही आपला निशाणा बनवला. यानंतर त्याच्या समोर कोणीच आलं नाही तर त्याने स्वत:वर चाकू हल्ला केला. कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. आरोपीचे वडील योगेंद्र वर्मा यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी त्यांचा मुलगा दीपक वर्मा दारू पिऊन घरी आला होता.

घरी आल्यानंतर तो म्हणायला लागला की, सर्वांना कापून टाकेन. इतकं म्हणून तो घरात घुसला आणि आई, वहिणीवर चाकूने हल्ला केला. आईचा आवाज ऐकून घरात असलेल्या त्याच्या मोठ्या भावाची पत्नी प्रीती तेथे आली. आरोपीने तिच्यावरही चाकूने वार केले. इतकंच नाही तर त्याने आपली भाची पुजा कुमारी हिच्यावर अनेकदा चाकूने वार केले. घरात किंकाळ्या सुरू होत्या. आवाज ऐकून शेजारी राहणारी सुमन आणि तिची काकी मुन्नी जेव्हा तिथे आले तेव्हा आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला व त्यांना घराबाहेर ढकलून दिलं.

हे ही वाचा-स्मशानभूमीबाहेर मृतांच्या अस्थिंचा ढिगारा; Covid च्या भीतीने कुटुंबीयांची पाठ

आरोपी दीपकने हे कृत्य केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात आपल्या आई, वहिनी, भाचीला तडफडत पाहत राहिला. तो घराबाहेर पडला आणि त्याने आपल्या मानेवर चाकू फिरवला. मानेवर वार झाल्यानंतर तो जमिनीवर कोसळला व तडफडू लागला. जखमी कुटुंबासह त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Published by: Meenal Gangurde
First published: October 8, 2020, 7:26 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या