मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /काठी बघून उधळला वळू, भर बाजारात घातला उच्छाद; पाहा भयंकर VIDEO

काठी बघून उधळला वळू, भर बाजारात घातला उच्छाद; पाहा भयंकर VIDEO

बाजारपेठेत व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्याने काठी उगारल्यानंतर उधळलेल्या वळूने (Bull attacks fruit seller and breaks his shop) अक्षरशः बाजारात उच्छाद मांडला.

बाजारपेठेत व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्याने काठी उगारल्यानंतर उधळलेल्या वळूने (Bull attacks fruit seller and breaks his shop) अक्षरशः बाजारात उच्छाद मांडला.

बाजारपेठेत व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्याने काठी उगारल्यानंतर उधळलेल्या वळूने (Bull attacks fruit seller and breaks his shop) अक्षरशः बाजारात उच्छाद मांडला.

रायपूर, 19 सप्टेंबर : बाजारपेठेत व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्याने काठी उगारल्यानंतर उधळलेल्या वळूने (Bull attacks fruit seller and breaks his shop) अक्षरशः बाजारात उच्छाद मांडला. फळ विक्रेत्याच्या दुकानावर हल्ला करणाऱ्या (Attack by street bull) वळूला हाकलण्यासाठी दुकानदाराने काठी उगारल्यानंतर वळूने दुकानावर हल्लाबोल केला. वळूचं रौद्र रुप पाहून दुकानदाराला माघार घेण्यावाचून काहीच पर्याय उरला नाही.

वळूचा उच्छाद

छत्तीसगडमधील लोरमी बाजार परिसरात भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी अनेक भटकी जनावरे फिरत असतात. एक वळू फळाच्या दुकानापाशी आला असता, दुकानदाराने त्याला हाकलण्यासाठी काठी उगारली. त्यावर वळू उधळला आणि त्याने पळांच्या दुकानावर हल्ला केला. आपल्या शिंगांनी त्याने दुकानातील फळांची नासधूस केली. दुकानातील साहित्याचीही तोडफोड केली. काही मिनिटं नासधूस केल्यावरच वळूचं समाधान झालं आणि तो तिथून निघून गेला. " isDesktop="true" id="606449" >

व्यापाऱ्यांना त्रास

लोरमी बाजारात गायी, म्हैशी आणि भटक्या वळूंची अक्षरशः उच्छाद मांडला आहे. चांगूलपणा आणि भूतदया म्हणून इथले व्यापारी शक्यतो प्राण्यांना मारहाण करत नाहीत. दुकानापाशी एखादा प्राणी आलाच, तर त्याला तिथून हाकलण्यासाठी काठी दाखवली जाते. मात्र अनेकदा प्राणी आक्रमक होतात आणि दुकानांवर हल्ले करतात. अनेकदा तर इथल्या व्यापाऱ्यांवर आणि ग्राहकांवरही वळूने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिकेने यावर काहीतरी उपाय करावा, अशी अपेक्षा व्यापारी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

हे वाचा -

प्रशासनाने दुर्लक्ष

अनेकदा व्यापाऱ्यांवर, दुकानांवर आणि ग्राहकांवर हल्ले होऊनदेखील प्रशासनाने यावर कुठलाही उपाय केलेला नाही. अनेक व्यापारी प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. अनेकदा प्राणी भुकेजलेले असतात आणि पोट भरण्यासाठी भाजी आणि फळविक्रेत्यांवर हल्ले करतात. या वळूंचा बंदोबस्त करावा आणि त्यांना या भागातून घेऊन जावं, अशी मागणी व्यापारी करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bull attack, Chattisgarh