मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पगार 35 हजार, घरात 45 लाख अन् बँकेतही...; स्टोअर किपरची कमाई पाहून अधिकारी अवाक्!

पगार 35 हजार, घरात 45 लाख अन् बँकेतही...; स्टोअर किपरची कमाई पाहून अधिकारी अवाक्!

लाखो कॅशसह बँकेतही मोठी रक्कम आहे. त्याशिवाय अनेक पॉलिसीदेखील आढळल्या आहेत.

लाखो कॅशसह बँकेतही मोठी रक्कम आहे. त्याशिवाय अनेक पॉलिसीदेखील आढळल्या आहेत.

लाखो कॅशसह बँकेतही मोठी रक्कम आहे. त्याशिवाय अनेक पॉलिसीदेखील आढळल्या आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 9 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) पाश काॅलोनी दांगी स्टेटमध्ये राहणाऱ्या आरोग्य विभागाच्या स्टोअर किपर केबी वर्माच्या घरात मंगळवारी आर्थिक गुन्हे इन्वेस्टिगेशन ब्यूरो EOW ने छापेमारी केली. तर एक टीम घरात कारवाई करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारापेक्षा अधिक संपत्ती असल्यामुळे ही छापेमारी करण्यात आली. EOW चे एसपी राजेश मिश्रा यांनी सांगितलं की, टीमने दोन्ही ठिकाणी एकत्र कारवाई केली. छापेमारीत 45 लाख रुपयांची कॅश आणि 9 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर खात्यात 22 लाख मिळाले आहेत. 23 एलआयसी पॉलिसी आणि जमिनीचे कागदपत्रही सापडले आहेत. स्टोअर किपरच्या पदावर असलेल्या लिपिकाला 30 ते 35 हजार रुपये महिन्याचा पगार मिळतो. सीहोरच्या आरोग्य विभागात असलेला स्टोअर किपर केबी वर्मा सध्या बैतूलमध्ये पदस्थ आहे. दुपारी EOW ची टीम दांगी स्टेटमधील त्याच्या घरी पोहोचली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 लाख रुपय़ांच्या कॅशसह सोने-चांदीचे दागिने, काही पॉलिसी मिळाल्या आहेत. वर्मा सीहोर आरोग्य विभागाच्या स्टोअर किपरच्या पदावर बऱ्याच काळापासून काम करीत आहे. दोन्ही ठिकाणी टीम कारवाई करीत आहे. हे ही वाचा-नेता- अभिनेता नाही; 'हा' आहे वाहन चोर...तरी रस्त्यावर लागले होर्डिंग्स बैतूलमध्ये सीएमएचओ कार्यालयात पदस्थ स्टोर कीपर कृष्ण वल्लभ वर्माच्या घरात ईओडब्ल्यूच्या छापेमारीमुळे बैतूल आरोग्य विभागात खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी भोपाळमधून टीम बैतूलला पोहोचली होती. येथे वर्माच्या घरातून त्यांना काही कॅश मिळाली. तपासानंतर वर्माला घेऊन टीम सीहोरला रवाना झाली.

First published:

Tags: Bhopal News, Financial fraud, Madhya pradesh

पुढील बातम्या