Home /News /crime /

गोव्यातील तरुणावर अमेरिकेत गोळीबार; शॉपमध्ये शिरून गिऱ्हाईकांसमोरच हल्ला, धक्कादायक घटनेचा VIDEO

गोव्यातील तरुणावर अमेरिकेत गोळीबार; शॉपमध्ये शिरून गिऱ्हाईकांसमोरच हल्ला, धक्कादायक घटनेचा VIDEO

ही संपूर्ण घटना दुकानात असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे (Murder Caught on Camera). या घटनेचा व्हिडिओ (Shocking Video) थरकाप उडवणारा आहे.

    वॉशिंग्टन 22 मार्च : कामाच्या निमित्ताने अनेक लोक आपला देश सोडून परदेशात जातात. मात्र, इथे अनेकदा कारण नसताना त्यांना अशा संकटांचा सामना करावा लागतो, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. जॉन डायस नावाच्या एका व्यक्तीसोबतही असंच घडलं. जॉन हा मूळचा दक्षिण गोव्यातील, मात्र पैसे कमावण्यासाठी तो अमेरिकेत गेला. परंतु, नियतीने पुढे काय वाढून ठेवलंय, याची कल्पनाही त्याला कदाचित नव्हती. कुत्रा चावला म्हणून शेजारच्याने केला ब्लेडने हल्ला; शेवटी मालकाने जीवच घेतला जॉन डायस हा अमेरिकेतील ह्यूस्टन येथे एका दुकानात स्टोअरकीपर होता. मात्र दुकानात शिरलेल्या एका कथित दरोडेखोराने गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्याचा प्रयत्न केला (Storekeeper Shot Dead by an Alleged Robber). ही संपूर्ण घटना दुकानात असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे (Murder Caught on Camera). या घटनेचा व्हिडिओ (Shocking Video) थरकाप उडवणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एक स्टोअरकिपर दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांसोबत बोलत त्यांना मदत करत आहे. यावेळी काळ्या कापडाने आपला चेहरा झाकलेला एक व्यक्ती बराच वेळ दुकानातच स्टोअरकिपरच्या आजूबाजूला फिरत राहातो. मात्र आपल्या कामात व्यस्त असलेल्या स्टोअरकिपरला त्याच्यावर संशय येत नाही. बराच वेळ तिथेच फिरल्यानंतर अखेर हा व्यक्ती आपल्याकडची बंदूक काढतो आणि गिऱ्हाईकांसमोरच जॉन डायस याच्यावर गोळीबार करतो. यानंतर आजूबाजूला असलेले लोक तिथून पळ काढतात. लेडी डॉनच्या बहिणीवर प्रेम करणं पडलं महागात; LOVE STORY चा वेदनादायी शेवट ही संपूर्ण घटना शॉपमधील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जॉन डायस हा आपल्या कामावर असताना एका अज्ञात व्यक्तीने दरोड्याच्या प्रयत्नात त्याच्यावर गोळीबार केल्याचं म्हटलं जात आहे. जॉन डायस हा आधी चांदोर स्पोर्ट्स क्लबचा माजी गोलकीपर होता आणि सध्या तो ह्यूस्टनमध्ये काम करतो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Murder, Shocking video viral

    पुढील बातम्या