Home /News /crime /

मधुचंद्राच्या रात्री नवरीला पोटदुखी; औषध घेऊन घरी परतला नवरदेव, त्यानंतर हादरलाच!

मधुचंद्राच्या रात्री नवरीला पोटदुखी; औषध घेऊन घरी परतला नवरदेव, त्यानंतर हादरलाच!

कोरोना काळात लग्नाचा समारंभ आणि सर्वच गोष्टी यथासांग पार पडल्याने सर्वजणं निश्चिंत होतं. मात्र लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    भिंड, 7 मे : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. नवीन लग्न झाल्यानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. कोरोना काळात लग्नाचा समारंभ आणि सर्वच गोष्टी यथासांग पार पडल्याने सर्वजणं निश्चिंत होतं. मात्र लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नवरदेव पुरता हादरला आहे. भिंड पोलीस ठाणे हद्दीत बैरागपूरमध्ये एक घरात नवीन लग्न झालं होतं. लग्नाच्या मधुचंद्राच्या दिवशी हा प्रकार घडला. येथे मनोज सोनी याने दलालांच्या माध्यमातून 35 हजार रुपये देऊन लग्न केलं होतं. काही जवळचे मित्र या लग्नात उपस्थित होते. सप्तपदी घेत दोघांचाही लग्नसोहळा यथासांग पार पडला. लग्नानंतर तरुण खूप आनंदी होता. लग्नानंतर तरुण मुलीला घेऊन घरी आला. मात्र नेमक्या मधुचंद्राच्या रात्री 11 वाजता नवरीच्या पोटात दुखू लागलं. यावर नवरदेव म्हणाला की, उन्हाळ्यामुळे त्रास होत असेल. शतपावली केल्यानंतर बरं वाटेल. नवरी तासभर घराबाहेर फेऱ्या मारत राहिली. पण तरीही पोटदुखी कमी झालं नसल्याचं नवरीने सांगितलं. यानंतर तरुण औषध आणण्यासाठी घराबाहेर पडला. हे ही वाचा-रिसॉर्टमध्ये सेक्सदरम्यान पतीला अचानक आली झोप; सकाळी मृत अवस्थेत आढळली महिला काही वेळानंतर जेव्हा तरुण बाजारातून औषध घेऊन आला तर त्याला धक्काच बसला. खोलीतून नवरी गायब झाली होती. त्याने तिचा खूप शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. यानंतर तरुण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला. मात्र तरीही नवरीबद्दल त्याला काहीच कळू शकलेले नाही. तरुणाने ज्या दलालाकडून मुलीला खरेदी केलं होतं, तोदेखील आता संपर्क करीत नाही. मात्र नवरी घरी परतेल, असा त्याला विश्वास आहे. मध्य प्रदेशात लग्नाच्या नावावर धोका देण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. लग्नानंतर काही दिवस सासरी राहिल्यानंतरही नवरी फरार होतात, असाही प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशात असे अनेक रॅकेट सक्रिय आहेत. जे लोकांना चुना लावतात.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Marriage

    पुढील बातम्या