Home /News /crime /

5 गर्लफ्रेंड्स असलेल्या निखिल ठाकरेचा प्रताप पाहून पोलीसही झाले अवाक्, पाहा हा VIDEO

5 गर्लफ्रेंड्स असलेल्या निखिल ठाकरेचा प्रताप पाहून पोलीसही झाले अवाक्, पाहा हा VIDEO

त्याच्याकडे खूप पैसा आहे. हे दाखवण्यासाठी निखिलने मोबाईल चोरीचा धंदा सुरू केला होता. अखेर आता पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या आहेत.

कल्याण, 29 ऑक्टोबर : कल्याणमध्ये पोलिसांनी (kalyan Police) एका मोबाइल चोराला (Mobile theft) अटक केली आहे. या मोबाइल चोरट्याकडून दहा मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. एका साथीदाराच्या मदतीने हा चोरटा मोबाइल हिसकावून पळ काढायचा. विशेष म्हणजे, निखील ठाकरे नावाच्या या चोरट्याच्या पाच गर्लफ्रेंड असून त्यांची हौस भागविण्यासाठी हा मोबाइल चोरायचा. कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivali) परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. अ‍ॅक्टिव्हा स्कुटरवर स्वार दोन चोरटे लोकांच्या हातातील मोबाइल हिसकावून पसार व्हायचे. कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात एका तरुणाचा मोबाइल हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेचा तपास पोलीस अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे दिला गेला. अखेर पोलिसांना तपासात यश आले. भिवंडी येथील नांदेडकरमध्ये राहणारा मोबाइल चोरटा निखील ठाकरे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा मोबाइल हस्तगत केले. कल्याणमधील तीन घटना उघडकीस आल्या आहेत. अन्य मोबाइल याने कुठून चोरले आहे. याचा तपास सुरू आहे. तसंच, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. निखील याला पाच गर्लफ्रेंड आहेत. तो प्रत्येक गर्लफ्रेंडची हौस भागवतो. त्याच्याकडे खूप पैसा आहे. हे दाखविण्यासाठी निखिलने मोबाईल चोरीचा धंदा सुरू केला होता. अखेर आता पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या आहेत. या सोबतच महात्मा फुले पोलिसांनी दुसऱ्या प्रकरणातील दोन मोबाइल चोरटे अविनाश विठ्ठल आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करुन त्याच्यांकडूनही मोबाईल हस्तगत केले आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या