मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दुसऱ्या पतीच्या मुलासोबत महिलेचं भयानक कृत्य; ठाण्यातील घटनेने खळबळ

दुसऱ्या पतीच्या मुलासोबत महिलेचं भयानक कृत्य; ठाण्यातील घटनेने खळबळ

अंतिमादेवी हिचेसुद्धा हे दुसरे लग्न आहे.

अंतिमादेवी हिचेसुद्धा हे दुसरे लग्न आहे.

अंतिमादेवी हिचेसुद्धा हे दुसरे लग्न आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  News18 Desk

विनोद राय, प्रतिनिधी

ठाणे, 30 सप्टेंबर : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली हे सांस्कृतिक शहर मानले जाते. मात्र, याठिकाणी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी सावत्र आईने केलेल्या बेदम मारहाणीत साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी निर्दयी सावत्र आईला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

या सावत्र आईचे नाव अंतिमादेवी आहे. ती डोंबिवली पूर्वच्या गोग्रासवाड़ी परिसरातील संजय जायसवाल याची पत्नी आहे. अंतिमा त्याची दुसरी पत्नी आहे. तसेच पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा होता. ज्याचे नाव कार्तिक असे आहे.

संजय चहा विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अंतिमा देवी आपला सावत्र मुलगा कार्तिकला नेहमी मारहाण करत असे.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साडेतीन वर्षाच्या कार्तिकच्या चुकीमुळे त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या जोरदार मारहाणीमुळे कार्तिक बेशुद्ध झाला. यानंतर त्याला कल्याण येथील शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची अवस्था गंभीर झाल्याने त्याला कळवा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सावत्र आई अंतिमादेवी हिला अटक केली आहे.

हेही वाचा - गरिबीमुळे आई मोबाईल घेऊन देऊ शकली नाही; नाराज मुलाने उचललं धक्कादायक पाऊल

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंतिमादेवी हिचेसुद्धा हे दुसरे लग्न आहे. तिच्या पहिल्या नवऱ्याला दारुचे व्यसन होते. तसेच तो तिला खूप त्रास द्यायचा. त्यामुळे तिने कंटाळून आपल्या पहिल्या नवऱ्याला सोडून संजय जयसवाल सोबत दुसरे लग्न केले. अंतिमादेवीलाही आपल्या पहिल्या पतीपासून 3 मुले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime news, Dombivali, Murder