Home /News /crime /

MBA पूर्ण झाल्यानंतर सुरू केला अवैध व्यवसाय; आता स्पोर्ट्स बाईक, लग्जरी कार आणि लाखोंची कॅश घरात!

MBA पूर्ण झाल्यानंतर सुरू केला अवैध व्यवसाय; आता स्पोर्ट्स बाईक, लग्जरी कार आणि लाखोंची कॅश घरात!

हा तरुण दिवसाला तब्बल 9 लाखांचा व्यवसाय करतो...मात्र...

    पाटना, 17 जानेवारी : कमी वेळात जास्त कमाईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 28 वर्षीय एका एमबीए ग्रॅज्युएटने असा रस्ता निवडला की ज्याच्या सुरुवातीला तरुणाला चांगले पैसे मिळाले मात्र त्याचा शेवट कधीच चांगला ठरणार नव्हता. सुरुवातीला तरुणाला दिवसाला 9 लाख रुपये मिळत होते. यातून त्याने लग्जरी कार, स्पोर्ट्स बाईक खरेदी केली. मात्र लवकरच पोलिसांनी त्याला पकडलं व त्याच्या बेकायदेशीर स्वप्नांना पूर्णविराम लागला. (Started illegal business after completing MBA ) हा तरुण बिहारमध्ये दारू बंदी असताना अवैधपणे दारूची तस्करीमध्ये सामील होता. (Liquor Smuggler) अखेर पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं. नोएडाच्या खासगी विद्यापीठातून पूर्ण केलं MBA पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचं नाव अतुलसिंग असं आहे. त्याने नोएडाच्या खासगी विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. असं सांगितलं जात आहे की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बिहारमध्ये बेकायदेशीर दारूच्या तस्करीचं काम सुरू केलं. कमी वेळात जास्त पैसे कमावण्यासाठी त्याने या मार्गाचा अवलंब केला. त्याने तस्करीच्या पैशातून सुमारे 8 लाख किमतीची लक्झरी कार, आयफोन, स्पोर्ट्स बाईकही घेतली. गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री पाटण्यातील पत्रकार नगर पोलिसांनी महात्मा गांधीनगर येथील भाड्याच्या घरातून त्याला अटक केली. हे ही वाचा-चालक बसवर चढला आणि काही सेकंदात अख्खी बस जळाली; बचावलेल्यांचा जीवघेणा अनुभव या कारवाईत पोलिसांनी आरोपी अतुलच्या घरातून सुमारे 21 लाख रुपये किंमतीचे 1100 लिटरपेक्षा जास्त दारू जप्त केली आहे. पत्रकार नगर पोलीस स्टेशनचे एसएचओ मनोरंजन भारती यांनी सांगितलं की, अतुलच्या ताब्यातून मिळालेल्या डायरीतून तो शहरातील विविध भागात दररोज 9 लाख रुपयांच्या दारूची  विक्री करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या भाड्याने घेतलेल्या घरातून बँक पासबुक व पैशाच्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. पोलीस चौकशीत अतुलने सांगितलं की, तो पाटना ग्रामीणच्या अलावलपूर गावचा रहिवासी आहे. (Started illegal business after completing MBA ) त्याने सांगितले पाटन्यात दारू पोहोचविण्यासाठी त्याने बेरोजदार मुलांना  डिलिव्हरी एजंट म्हणून कामावर ठेवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल या तरुणांना दारू ट्रान्सपोर्ट करण्यासाठी 500 रुपये द्यायचा. या अवैध व्यापारात जवळपास 30 ते 40 तरुणांचा सहभाग होता. हे ही वाचा-गुजरातमधील तरुणाचा प्रताप; अमेरिकेतील वयोवृद्धाला तब्बल 58 कोटींचा घातला गंडा अतुलच्या चौकशीत उघडकीस आल्यावर पोलिसांनी सापळा रचून अतुलचे दोन साथीदार इंद्रजित सिंह आणि संजीव कुमार यांना पकडले. सुरुवातीला अतुलने नोएडामधील खासगी विद्यापीठातून एमबीएचा विद्यार्थी असल्याचे सांगून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. (Started illegal business after completing MBA ) त्याने आपले विद्यापीठाचे ओळखपत्र दाखविले असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु छापा मारणाऱ्या पथकाला अन्य पुरावे सापडल्यानंतर त्याला आपला गुन्हा कबूल करावा लागला. त्याच्या ताब्यात 1.75 लाख रुपयांची बॅग सापडली. त्याने दोन खोल्या देखील ठेवल्या ज्यामध्ये त्याने दारूचे सामान ठेवले. येथूनच तो दारू पुरवत असे. पोलिसांनी अतुल तसेच त्याचा साथीदार विशाल कुमार याला अटक केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news

    पुढील बातम्या