दहशतवादी तुरुंगात कैद असतानाही वंशावळ वाढतेय; धक्कादायक प्रकार आला समोर

दहशतवादी तुरुंगात कैद असतानाही वंशावळ वाढतेय; धक्कादायक प्रकार आला समोर

दहशतवादाच्या आरोपाखाली कैद केलेल्या कैद्यांना वैवाहिक भेटी (Conjugak Visit) घेण्यास परवानगी देण्यात येत नाहीत. या कारणास्तव हा प्रकार वाढत आहे

  • Share this:

तेल अवीव, 13 डिसेंबर : इस्त्रायली (israel) तुरुंगात कैद असलेले दहशतवादी आता आपल्या पत्नींना शुक्राणूंची तस्करी करून गर्भवती करीत आहेत. यामुळे दहशतवाद्यांची  वंशवृद्धी होत आहे. परिणामी भविष्यात इस्राईलला अधिक धोका निर्माण झाला आहे. इस्त्राईलमध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली कैद केलेल्या कैद्यांना वैवाहिक भेटी (Conjugak Visit) घेण्यास परवानगी देण्यात येत नाहीत. या कारणास्तव अतिरेकी त्यांच्या शुक्राणूंची डबीतून तस्करी करीत आहेत आणि त्यांच्या पत्नींकडे पाठवित आहेत.

काय असते वैवाहिक मुलाखत

वैवाहिक मुलाखतीत कैद्यांना आपल्या पत्नींसोबत काही तास एकांतात मिळण्याची सूट दिली जाते. ज्यामुळे जेल अधिकाऱ्यांच्या आड कैद्यांच्या पत्नी गर्भवती होतात. दहशतवाद्यांना ही सुविधा मिळत असल्याने त्यांच्यासाठी स्पर्म स्मगलिंगचा एकमेव पर्याय आहे. इज्राईलच्या हाय सिक्युरिटी जेलमध्ये मात्र दहशतवाद्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही.

सुरुवात कशी झाली

1986 मध्ये, लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनच्या काही दहशतवाद्यांनी इस्त्रायली सैनिक मोशे तमामचं अपहरण करून ठार केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईलच्या गुप्तचर यंत्रणांनी मध्य इस्त्राईलच्या टीरा शहरातून इस्त्रायली अरबी वालिद डक्का याला अटक केली होती. दहशतवादांच्या घटनेत सामील झाल्याकारणाने कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दहशतवाद्याने तुरूंगात लग्न केले

तुरूंगात असताना त्यांची भेट इस्त्रायली अरबी महिला पत्रकार सना सलामा यांच्याशी झाली. त्या दिवसांत साना पॅलेस्टाईन कैद्यांच्या जीवनाविषयी लिहत होती, ज्यामुळे तिची इस्रायली तुरुंगात कैद केलेल्या पॅलेस्टाईन दहशतवाद्यांची भेट होत होती. जेलमध्ये कैद असलेले  वालिद डाक्काने 1999 मध्ये साना सलामाशी लग्न केले होते. या जोडप्याला स्वत:साठी एक मूल हवे होते, परंतु दहशतवाद्यांना वैवाहिक जीवनाची परवानगी न मिळाल्यामुळे त्यांची इच्छा यशस्वी झाली नाही.

शुक्राणूंची तस्करी करण्याची पद्धत झाली सुरू

इस्त्रायली अधिकाऱ्यांना भीती आहे की दहशतवाद्यांना वैवाहिक भेटीस परवानगी दिली गेली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यांचा असा आरोप आहे की अशा भेटींचा वापर दहशतवाद्यांनी शस्त्रे, पैसा आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी केला जाऊ शकतो. या कारणास्तव, या दहशतवाद्यांनी शुक्राणूंची तस्करी करण्याची पद्धत सुरू केली.

आतापर्यंत 60 हून अधिक दहशतवाद्यांच्या पत्नी झाल्या आई

सांगितलं जात आहे की, 2012 मध्ये साना ही पहिली महिला आहे जी स्पर्म स्मगलिंगच्या माध्यमातून गर्भवती झाली होती. यानंतर 2018 पर्यंत 60 हून अधिक पॅलेस्टाइन दहशतवाद्यांच्या पत्नींनी स्पर्म स्मगलिंगच्या माध्यमातून मुलांना जन्म दिला. या सर्व महिलांचे पती दहशतवादी घटनांमध्ये सामील असल्यामुळे इज्राईलच्या विविध तुरुंगात कैद आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: December 13, 2020, 3:18 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या