'स्पेशल 26' आणि 'क्राईम पेट्रोल' पाहून आखला गुन्ह्याचा कट; 4 सुशिक्षित तरुण पोलिसांच्या ताब्यात

'स्पेशल 26' आणि 'क्राईम पेट्रोल' पाहून आखला गुन्ह्याचा कट; 4 सुशिक्षित तरुण पोलिसांच्या ताब्यात

6 तरुणांनी मिळून अपहरण करण्याची कंपनी सुरू केली होती. याचा मास्टरमाइंड राजकुमार दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएट आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 डिसेंबर : येथून एका गुन्हेगारी गँगला पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे. 4 तरुणांनी अपहरण करण्यासाठी तयार केलेल्या गँगकडून हा गुन्हा केला जात असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक म्हणजे स्पेशल 26 या चित्रपटातून अपहरणाचा कट आखल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

ही टीम सायबर सेलचे अधिकारी होऊन खंडणी मागत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.  24 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी ज्ञानेश्वर शुक्ला नावाच्या तरुणाचं अपहरण झाल्याची माहिती मिळाली होती. हा तरुण जॉब प्लेसमेंट कंपनीत कार्यरत आहे. या तरुणाचं अपहरण केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून 5 लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती.

नवी दिल्लीत 6 तरुणांनी मिळून अपहरण करण्याची कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून खंडणीद्वारे ते बेकायदेशीरपणे पैसे जमा करीत होते. ही गुन्हेगारी त्यांनी स्पेशन 26 चित्रपट पाहून केल्याची कबुली तरुणांनी दिली आहे. ज्ञानेश्वरच्या अपहरणानंतर दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन सुरू केलं. सीसीटीव्ही आणि कॉल डिटेल्स शोधून काढले. तरुणाचं अपहरण केल्यानंतर ते तरुण आपला फोन आणि लोकेशन बदलत होते. मात्र पोलिसांनी त्यांचे मोबाइल ट्रॅक करुन अपहरणकर्त्यांना शोधून काढलं. ते ओखला जंगलात लपून बसले होते. पोलिसांनी ओखला फेज 3 आणि हरकेश नगरमधून 4 आरोपींना अटक केली आणि ज्ञानेश्वर शुक्लाला सोडवलं.

चौकशीदरम्यान आरोपी राजकुमार चौहान आणि राहुल, संतोष सिंह व गौरव यांना अटक करण्यात आली आहे. या अपहरणाचे मास्टरमाइंड राजकुमार यांनी पोलिसांना सांगितलं की, ते अनेक महिन्यांपासून अपहरण करण्याचं प्लानिंग करीत होते आणि या सर्वांनी मिळून 6 जणांची गँग बनवली होती. या सर्वांनी अनेकदा स्पेशन 26 चित्रपट पाहिला होता, इतकच नाही तर ते क्राईम पेट्रोल नियमित पाहत होते. यातील एक आरोपी येथील लोकल न्यूज चॅनलमध्ये काम करतो. मास्टरमाइंड राजकुमार दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएट आहे आणि कम्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स केला आहे, अशी माहिती येथील डीसीपींनी दिली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 4, 2020, 9:43 PM IST

ताज्या बातम्या