भाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल? नेत्याच्या विधानानं खळबळ

भाजप खासदाराच्या मुलानं थायलँडमधून बोलावली होती कॉल गर्ल? नेत्याच्या विधानानं खळबळ

उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये थायलँडच्या एका युवतीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. अशात भाजपचे राज्यसभा खासदार (BJP MP) संजय सेठ यांच्या मुलानंच या कॉल गर्लला (Call Girl) बोलावून घेतलं होतं, असा आरोप होत आहे.

  • Share this:

लखनऊ 10 मे: जगभरात कोरानानं (Coronavirus) हाहाकार घातलेला असतानाच उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये थायलँडच्या एका युवतीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. दहा दिवसांपूर्वी या मृत युवतीला सात लाख रुपये देऊन बोलावण्यात आलं होतं. अशात आता समाजवादी पार्टीच्या प्रवक्त्यानं असा आरोप केला आहे, की भाजपचे राज्यसभा खासदार (BJP MP) संजय सेठ यांच्या मुलानंच या कॉल गर्लला (Call Girl) बोलावून घेतलं होतं. याप्रकरणी लखनऊ पोलीस सध्या तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण :

मागील काही दिवसांपासून असं वृत्त समोर येत आहे, की लखनऊमधील एका बड्या व्यापाऱ्याच्या मुलानं सात लाख रुपये खर्च करुन थायलँडवरुन कॉल गर्ल बोलावली होती. दहा दिवसांपूर्वीच तिला लखनऊमध्ये बोलावलं गेलं होतं, यानंतर दोनच दिवसात तिला कोरोनाची लागण झाली आणि तिची प्रकृती गंभीर झाली. या घटनेची माहितीही थायलँड दूतावासाला देण्यात आली. दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तीन मे रोजी तिचा मृत्यू झाला.

कॉल गर्लच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी सुरू केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्लीमध्ये सेक्स रॅकेटचा पसार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. थायलँडमधून भारतात आलेल्या कॉल गर्लच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तपासही पोलीस करत आहेत.

एसपी प्रवक्त्यानं केले आरोप -

यादरम्यान समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी आरोप केला आहे, की थायलँडच्या कॉल गर्लला भाजपचे राज्यसभा खासदार संजय सेठ यांच्या मुलानंच बोलावलं होतं. त्यांनी संजय सेठ यांचा पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो शेअर करत म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभा राहून हसत असलेल्या भाजप खासदार संजय सेठ यांच्या मुलावर गंभीर आरोप आहेत. जगभरात कोरोनानं कहर घातलेला असताना थायलँडमधून कॉल गर्ल बोलावली गेली, जिचा आता कोरोनानं मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि कारवाई करण्याची हिंमत आहे का?

याप्रकरणी पोलिसांनी अद्याप तरी भाजप नेत्याची आणि त्यांच्या मुलाची काहीही चौकशी केलेली नाही. पोलीस याप्रकरणी सध्या तपास करत आहेत. जिल्ह्यात विदेशी कॉल गर्लचं नेटवर्क चालत आहे? याचा तपासही पोलीस करत आहेत. पोलीस राजस्थानच्या ट्रॅव्हल एजंटचाही तपास करत आहेत, ज्यानं कॉल गर्लला भारतात आणलं होतं.

Published by: Kiran Pharate
First published: May 10, 2021, 9:51 AM IST

ताज्या बातम्या