'हे भारत माते मला माफ कर', 17 वर्षीय मुलीच्या आत्महत्येमुळे विठुरायची नगरी हादरली

'हे भारत माते मला माफ कर', 17 वर्षीय मुलीच्या आत्महत्येमुळे विठुरायची नगरी हादरली

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या स्वप्नालीच्या आत्महत्येमुळे शेळवे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

  • Share this:

पंढरपूर, 14 डिसेंबर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील शेळवे इथं गावातील काही उनाड तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्नाली सत्यवान गाजरे असं या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या  स्वप्नालीच्या आत्महत्येमुळे शेळवे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या बाबत सविस्तर हकीकत अशी की, सत्यवान प्रभु गाजरे (वय 43) हे शेळवे गावात पंचरचे दुकान चालवतात. मयत मुलगी स्वप्नाली ही इयत्ता 11वी मध्ये केबीपी कॉलेज येथे शिकत होती. ती दररोज मोटार सायकलवरून येऊन जाऊन करत होती. शुभांगी ही इयत्ता 12वी मध्ये वाडी कुरोली येथे कॉलेजला जात होती. सध्या लॉकडाउन लागल्यामुळे घरीच ऑनलाइन शिक्षण घेत होती. 6 डिसेंबर रोजी स्वप्नालीने राहत्या घरी ती अभ्यास करीत असलेल्या खोलीमध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणाने पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

त्यानंतर दोन दिवसांनी 9 डिसेंबर रोजी  मयत स्वप्नाली हिचे शाळेची बॅग तपासले असता त्यात अर्धे पानाची चिठ्ठी सापडून आली होती. या चिठ्ठीत तिने आत्महत्येच कारण लिहिले आहे.

राशीभविष्य : मिथुन आणि मकर राशींच्या व्यक्तींना करावा लागेल समस्यांचा सामना

"किती सहन करू मी मला आता अजिबात सहन होत नाही. तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबात नाही. कारण रमेश गाजरे, लहु ट्रेलर, स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नाचा तर धुराळाच केलाय. रमेश गाजरेनं हात धरुन केलेली छेडछाड आणि कुणाला सांगू नको म्हणून दिलेली जीव मारणार ही धमकी मला सहन होत नाही. लहु ट्रेलर स्वप्नीलला घेवून दुकानात मोठमोठ्याने घाणरेडी गाणी लावायचा. या पोरांना घेवून नाचायचा. सगळे जण स्वप्नाली म्हणून नववीपासूनच चिडवायची. जाता – येता त्यांच्या नजरेचा मला लय त्रास व्हायचा आजपर्यंत सहन केलं पण आता सहन होत नाही, म्हणून मी आज माझं जीवन संपवतेय. हे भारत माते मला माफ कर, आई-बापू मला माफ करा आत्महत्या करणे गुन्हा आहे. तरी सुद्धा मी करतेय" असा मजकूर स्वप्नालीने चिठ्ठीत लिहिला होता.

मित्राला दिल्या सुखी संसाराच्या शुभेच्छा,ट्रकच्या धडकेत 4 मित्र जागीच ठार

दरम्यान, फिर्याद दाखल करून घेण्याबात उशीर झाल्याबद्दल पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याकडे विचारणा केली असता सदर मुलीने आत्महत्या कारण्यापूर्वी लिहलेली सुसाईड नोट हि एका बॅगमध्ये ठेवलेली आढळली आहे. त्यानंतर सदर मुलीच्या पित्याने संपर्क करून आम्हाला याची माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 14, 2020, 7:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या