Home /News /crime /

काही वर्षांपूर्वी आईची विहिरीत आत्महत्या, त्याच विहिरीत मुलानेही संपवले जीवन

काही वर्षांपूर्वी आईची विहिरीत आत्महत्या, त्याच विहिरीत मुलानेही संपवले जीवन

काही वर्षांपूर्वी आईने ज्या विहिरीत आत्महत्या (Mother Suicide in Well) केली होती त्याच विहिरीत मुलानेही आत्महत्या (Son Suicide in Well) केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे घडली.

पुढे वाचा ...
  जालना, 16 मे : काही वर्षांपूर्वी आईने ज्या विहिरीत आत्महत्या (Mother Suicide in Well) केली होती त्याच विहिरीत मुलानेही आत्महत्या (Son Suicide in Well) केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे घडली. आदित्य सीताराम खोजे, असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. वडिलांनी शेती विकल्यामुळे बाप लेकात सतत भांडण होत होते. तसेच सावत्र आईचा जाचही त्याला सहन करावा लागत होता, असे सांगितले जात आहे. याप्रकरणी आदित्यचे आजोबा यांनी आदित्यचे वडील आणि सावत्र आईविरोधात तक्रार दिली. नेमकं असं काय घडलं मृत आदित्य याचे वडील सीताराम खोजे यांनी अर्धा एकर जमीन विकली. यामुळे आदित्य याचे त्याच्या वडिलांसोबत नेहमी भांडण होत होते. तसेच आईकडूनही त्याला सापत्न वागणूक मिळत होती. याच संपूर्ण परिस्थितीतून आदित्यने हे टोकाचे पाऊल उचलले. आदित्यने जोगेश्वरी गूळ यूनिटच्या बाजूलाच असलेल्या विहिरीत शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. आईनेही केली होती याच विहिरीत आत्महत्या - आदित्य याने ज्या विहिरीत आत्महत्या केली त्याच विहिरीत काही वर्षांपूर्वी त्याच्या आईनेसुद्धा आत्महत्या केली होती. रविवारी सकाळच्या सुमारास आदित्यचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. आत्महत्येच्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा - पत्नीने 50 हजारांत दिली पतीची सुपारी; प्रियकर आणि मुलानेही केली मदत
  यांच्याविरोधात तक्रार दाखल -
  आदित्य खोजे याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दुधना काळेगाव येथील रहिवासी त्याचे आजोबा राधाकिसन मस्के यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन आदित्यचे वडील सीताराम खोजे आणि त्याची सावत्र आई शीला सीताराम खोजे यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्दा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Maharashtra News, Police, Suicide

  पुढील बातम्या