Home /News /crime /

जीवघेणं भांडण! मुलाने मारली जोरदार थप्पड, वडिलांचा जागीच मृत्यू

जीवघेणं भांडण! मुलाने मारली जोरदार थप्पड, वडिलांचा जागीच मृत्यू

घरगुती भांडण विकोपाला (Son slaps father to death) जाऊन मुलाने वडिलांना थप्पड मारल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    जयपूर, 4 नोव्हेंबर: घरगुती भांडण विकोपाला (Son slaps father to death) जाऊन मुलाने वडिलांना थप्पड मारल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर बाप आणि (Fight between father and son) मुलगा यांच्यात हाणामारीला सुरुवात झाली. पाहता पाहता दोघंही एकमेकांना मारू लागले. या मारामारीत मुलाने मारलेली (Slap hit on the head of father) थप्पड वर्मी लागल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाला. घरगुती कारणावरून भांडण राजस्थानच्या डुंगरपूर भागात राहणाऱ्या 60 वर्षांची पूंजा कटारा यांचे त्यांच्या मुलासोबत सतत वाद होत असत. छोट्या मोठ्या कारणावरून झालेले हे वाद विकोपाला गेल्यावर दोघांमध्ये अधूनमधून हाणामारीदेखील होत असे. घटनेच्या दिवशी घरगुती कारणावरून वाद सुरु झाला आणि काही मिनिटांतच तो विकोपाला गेला. एकमेकांना धडा शिकवण्यासाठी सरसावलेल्या दोघांनीही मग बाह्या सरसावल्या आणि ते परस्परांच्या अंगावर धावून गेले. वडील आणि मुलगा यांच्यात काही वेळ हाणामारी झाली. त्यावेळी मुलाने वडिलांना एक थप्पड मारली. ही थप्पड त्यांच्या कानाच्या वर डोक्याजवळ लागली. त्यामुळे चक्कर येऊन ते कोसळले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी गर्दी मुलगा आणि वडील यांचं भांडण पाहण्यासाठी शेजाऱ्यांनी गर्दी केली होती. पूंजा कटारा यांचा मृत्यू झाल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. पित्याला थप्पड मारून त्यांचा बळी घेणाऱ्या मुलाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे वाचा- Aryan Khan Case: मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाच CCTV फूटेज, मोठा खुलासा होणार? परिसरात हळहळ किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पित्याला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अऩेक घरांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी होतच असते. मात्र त्यातून अशा प्रकारे झालेली हाणामारी आणि त्यातून गेलेला वडिलांचा जीव यामुळं सर्वांनाच धक्का बसला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Father, Police, Rajasthan, Son

    पुढील बातम्या