भोपाळ, 19 ऑगस्ट : वडिलांकडं (
Father) ठेवायला दिलेले 1500 रुपये
(Rs. 1500) त्यांनी खर्च (
spend) केल्याचा राग आल्यामुळे पोटच्या मुलानेच (
Son) वडिलांचा खून (
Murder) केल्याची घटना उघडकीला आली आहे. मुलाने आपल्या वडिलांकडे 1500 रुपये ठेवण्यासाठी दिले होते. हे पैसे जपून ठेवण्याची सूचना त्याने केली होती. मात्र वडिलांकडून काही कारणाने पैसे खर्च झाल्याचं समजताच मुलाच्या रागाचा पारा चढला.
अशी घडली घटना
मध्यप्रदेशातील सेवढा गावात कमलेश शर्मा हे 52 वर्षांचे गृहस्थ त्यांचा मुलगा सुंदरलालसह भाड्याच्या घरात राहत होते. सुंदरलाल एका दुकानात काम करून घर चालवत असे. तर वडिल दिवसभर घरीच असत. एक दिवस सुंदरलालने वडिलांकडे 1500 रुपये दिले आणि ते सांभाळून ठेवण्याची सूचना केली. संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर त्याने त्या 1500 रुपयांबाबत विचारणा केली. तेव्हा आपल्याकडून ते पैसे खर्च झाल्याचं वडिलांनी सांगितलं.
शिविगाळ आणि मारहाण
पैसे खर्च केल्याचं ऐकून सुंदरलालचा संताप झाला आणि त्याने वडिलांना शिविगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने जवळच पडलेल्या सळईने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यातील काही वार त्यांच्या डोक्यात लागले आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत चक्कर येऊन खाली पडले. वडिलांना चक्कर आल्याचं आणि त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचं पाहून सुंदरलाललनं तिथून पळ काढला, अशी बातमी '
दैनिक भास्कर'ने दिली आहे.
हे वाचा -
पत्नीवर उकळतं पाणी फेकत त्याने गाठला विक्रूतीचा कळस, समोर आलं संतापजनक कारण
शेजाऱ्यांनी कमलेश शर्मा यांच्या तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. डोक्यावर वार झाल्यामुळे मेंदूला जबर धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आरोपी सुंदरलालला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.