मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बेसबॉलच्या बॅटने डोकं फोडून हत्या; मृतदेह नदीत टाकला, पण.., रायगडमध्ये पोटच्या मुलानंच आईला संपवलं

बेसबॉलच्या बॅटने डोकं फोडून हत्या; मृतदेह नदीत टाकला, पण.., रायगडमध्ये पोटच्या मुलानंच आईला संपवलं

गेल्या अनेक दिवसांपासून वीणा कपूर आणि त्यांचा लहान मुलगा यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या संपत्तीवरून वाद सुरू होता. याच वादातून रागाच्या भरात मुलाने वीणा यांच्या डोक्यावर बेसबॉलच्या बॅटने जोरदार प्रहार केले

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Raigad, India

रायगड 08 डिसेंबर : संपत्तीच्या वादात 43 वर्षीय मुलानं त्याच्या आईचा खून केला आणि दुष्कृत्य उघड होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यात माथेरान येथे मृतदेह नदीत फेकून दिल्याचं समोर आलं आहे. वीणा कपूर (74) असं मृत महिलेचं नाव असून, तिचा 43 वर्षीय मुलगा व 25 वर्षीय नोकराला पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वीणा कपूर आणि त्यांचा लहान मुलगा यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या संपत्तीवरून वाद सुरू होता. याच वादातून रागाच्या भरात मुलाने वीणा यांच्या डोक्यावर बेसबॉलच्या बॅटने जोरदार प्रहार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार उघड होऊ नये म्हणून मुलानं वीणा यांचा मृतदेह माथेरानजवळच्या नदीत फेकून दिला होता. जुहू पोलिसांनी अगदी कमी वेळेत या प्रकरणाचा छडा लावला असून, मुलाने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अशी उघड झाली घटना

संपत्तीच्या वादातून मुलानेच आईचा खून केल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात उघड झाला. याबाबत बोलताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की मंगळवारी (6 डिसेंबर) रात्री कल्पतरू सोसायटीच्या सिक्युरिटी सुपरवायझरने जुहू पोलिसांशी संपर्क साधला होता. सोसायटीतली एक महिला बेपत्ता असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. याच तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. मृत महिलेचं मोबाइल लोकेशन शोधलं तेव्हा ते इमारतीजवळच सापडले. परंतु त्या महिलेचा मुलगा मात्र पनवेल येथे होता. पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यामुळे पोलिसांनी तिचा मुलगा व नोकराला पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी आणलं.

पोलिसांनी मुलाला अनेक प्रश्न विचारले तेव्हा संशय बळावला. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा आपणच खून केल्याचं वीणा कपूर यांच्या मुलानं कबूल केलं. संपत्तीचा वाद सुरू असल्यानं याच रागामध्ये आईच्या डोक्यात बेसबॉलच्या बॅटने अनेक वार करून आपण तिची हत्या केली असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. आपल्या हातून झालेला खून उघड होऊ नये म्हणून मुलाने आईचा मृतदेह रायगड जिल्ह्यात माथेरानजवळ एका नदीमध्ये फेकून दिला होता.

मृत वीणा कपूर यांचा मोठा मुलगा अमेरिकेमध्ये राहतो. खुनाचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांकडून भारतीय दंड विधान कलम 302 आणि कलम 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

First published:

Tags: Murder, Shocking