मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बापाच्या मौजेला कंटाळून मुलाने 70 हजारात केला खून, नंतर रचला 'हा' बनाव

बापाच्या मौजेला कंटाळून मुलाने 70 हजारात केला खून, नंतर रचला 'हा' बनाव

 बिहारच्या मुंगेर येथे एका युवकाला त्याच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी (father murder) अटक करण्यात आली आहे. सत्यवीर कुमार उर्फ छोटू असे आरोपीचे नाव आहे. पुलिस अधीक्षक (एसपी) जग्गुनाथ रेड्डी यांनी याप्रकरणाची माहिती दिली.

बिहारच्या मुंगेर येथे एका युवकाला त्याच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी (father murder) अटक करण्यात आली आहे. सत्यवीर कुमार उर्फ छोटू असे आरोपीचे नाव आहे. पुलिस अधीक्षक (एसपी) जग्गुनाथ रेड्डी यांनी याप्रकरणाची माहिती दिली.

बिहारच्या मुंगेर येथे एका युवकाला त्याच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी (father murder) अटक करण्यात आली आहे. सत्यवीर कुमार उर्फ छोटू असे आरोपीचे नाव आहे. पुलिस अधीक्षक (एसपी) जग्गुनाथ रेड्डी यांनी याप्रकरणाची माहिती दिली.

मुंगेर, 30 एप्रिल : बिहारच्या मुंगेर येथे एका युवकाला त्याच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी (father murder) अटक करण्यात आली आहे. सत्यवीर कुमार उर्फ छोटू असे आरोपीचे नाव आहे. पुलिस अधीक्षक (एसपी) जग्गुनाथ रेड्डी यांनी याप्रकरणाची माहिती दिली. सुरुवातीला आरोपी मुलाने पोलिसांसमोर एक वेगळं चित्र निर्माण केलं होतं. आपले वडील ज्या महिलेसोबत गेल्या काही वर्षांपासून राहत आहेत तिनेच त्यांची हत्या केल्याचा बनाव केला होता. पण पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली तेव्हा महत्त्वाची माहिती समोर आली. हत्येमागील खरा सूत्रधार समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले. अखेर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सत्यवीर कुमार उर्फ ​​छोटू याने त्याच्या वडिलांसोबत पाच वर्षांपासून राहणाऱ्या महिलेसह अन्य चार अनोळखी लोकांनी त्याच्या वडिलांचा खून केल्याची तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीनंतर तातडीने संबंधित महिलेला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली होती. मात्र, तपासादरम्यान, धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून झाला त्यादिवशी असरगंज पोलीस ठाणे परिसरात राहणाराृे गुन्हेगार मृताच्या घरी आले होते आणि त्यांनी सत्यवीरच्या वडिलांची हत्या केली. यानंतर तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची कसून चौकशी केली. तर तक्रारदार सत्यवीर उर्फ छोटू याने आपला गुन्हा कबूल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शामपूर ठाणे परिसरातील शिवपूर येथे 24 एप्रिलला संजय मंडल नावाच्या 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं. मृत व्यक्ती आणि त्याच्यासोबत अनेक वर्षांपासून राहणारी महिला दोन्ही जण झोपले असताना ही हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा - क्लबमध्ये अल्पवयीन मुलीचा न्यूड व्हिडीओ कांड; 6 दिवसांपासून झाली भयंकर व्यवस्था

मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली -

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, आरोपी मुलाने पोलिसांना सांगितले की, 6  वर्षांपूर्वी आगीत जळून त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचे वडील पूनम देवी नावाच्या विवाहित महिलेला घरी घेऊन आले. ते तिच्यासोबत राहू लागले. वडिलांनी आणि पूनम देवी दोघांनी मिळून घरातील अन्य सदस्यांना तिथून पळवून लावले. इतकेच नाही तर मृत व्यक्ती पूनम देवी या विवाहित महिलेच्या प्रभावात येऊन वडील पूर्वजांची संपत्ती विकून मौज-मस्ती करायला लागले. अशातच 11 मेला आरोपी सत्यवीरचे लग्न होणार होते. लग्नामुळे जेव्हा सत्यवीर घरी गेला तेव्हा त्याने आपल्या वडिलांची हत्या करण्याचे ठरवले. यानंतर त्याने 70 हजार रुपयांमध्ये असरगंज येथील 3 आरोपींना त्याच्या वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. यानंतर त्याने ज्या तीन जणांना सुपारी दिली त्यांच्यासोबत मिळून आपल्या वडिलांची हत्या केली. तसेच यानंतर हत्येचा आरोप पूनम देवी या त्याच्या वडिलांसोबत राहणाऱ्या विवाहित महिलेवर लावून दिला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Bihar, Murder