हैदराबादेत पुन्हा दुष्कृत्य.. जावईने केला सासूवरच बलात्कार

हैदराबादेत पुन्हा दुष्कृत्य.. जावईने केला सासूवरच बलात्कार

हैदराबादेतील पंजागट्ट पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

  • Share this:

हैदराबाद,15 डिसेंबर: तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना पुन्हा बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. एका नाराधमाने आईसमान सासूला आपल्या वासनेची शिकार केले आहे. पोलिसांनी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तिच्या जावईला अटक केली आहे. जावईविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हैदराबादेतील पंजागट्ट पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

48 वर्षीय पीडितेने शुक्रवारी तिच्या जावईविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. पीडित महिला एका अपार्टमेंटमध्ये मुलगी आणि जावईसोबत राहते. दारूच्या नशेत जावयाने बलात्कार केल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना घडली तेव्हा पीडित महिला घरात एकटी होती. आरोपी जावईने याचा फायदा घेऊन सासूला वासनेची शिकार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरुद्ध भादंवि कलम 376 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत असून आरोपीचे नाव गोपनिय ठेवले आहे.

शाळेबाहेर वडिलांची वाट बघत होती मुलगी, नराधनाने अपहरण करुन केला बलात्कार

शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरगाव येथे ही घटना घडली आहे. 9 वर्षीय शालेय मुलीवर अत्याचार करून नराधम फरार झाला आहे. पीडित चिमुरडीवर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत असून शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर वडीलांची वाट बघत उभ्या असलेल्या नऊ वर्षीय शाळकरी मुलीस वडीलांनी घ्यायला पाठवलंय असं सांगत एका तरूणाने तिचे मोटर सायकलवरून अपहरण केले आणि गावापासून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी एका ठिकाणी आरोपीने सदर मुलीला सोडून देत मोटरसायकल टाकून पोबारा केला. मुलीस मारहाण करुन आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याच पोलिस तपासात निष्पन्न झाले असून कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार, अपहरण, पॉक्सो तसेच अँट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुरूवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.

दरम्यान, आरोपी गावात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटारसायकलवरुन पीडित मुलीस घेऊन जात असताना कैद झाला आहे. सदर आरोपी हा ऊस तोडणी कामगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून दीड महिन्यांपासून तो या परिसरात राहात असल्याचीही माहिती आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 15, 2019, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading