Pune Crime: जावयावर जडलेल्या प्रेमापोटी सासूनं काढला घरातून पळ, पुढे जे घडलं ते हादरवणारं

Pune Crime: जावयावर जडलेल्या प्रेमापोटी सासूनं काढला घरातून पळ, पुढे जे घडलं ते हादरवणारं

Crime in Pune: आरोपी जावई आणि मृत सासू यांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. यातूनच हे दोघं कर्नाटकातून पुण्याला पळून आले होते.

  • Share this:

पुणे, 03 मे: पुण्यातील बिबवेवाडी याठिकाणी राहाणाऱ्या एका युवकानं आपल्या सासूची गळा दाबून हत्या (Son in law killed mother in law) केली आहे. विशेष म्हणजे संबंधित जावई आपल्या सासूला घेऊन कर्नाटकातून पळून पुण्याला आला होता. याठिकाणी आल्यानंतर त्यांच्यात सातत्यानं वाद होऊ लागले. या दररोजच्या भांडणाला कंटाळून जावयानं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या सासूची गळा दाबून हत्या केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

संबंधित 45 वर्षीय मृत सासूचं नाव अनारकली महमद तेरणे असून ती मुळची बेळगाव येथील रहिवासी आहे. तर सध्या ती आपला 26 वर्षीय जावई असिफ आतारसोबत पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील शेळकेवाडी याठिकाणी राहात होती. सासूच्या हत्येप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी जावई असिफला अटक केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

जावयाचं सासूवर जडलं प्रेम

काही दिवसांपूर्वी आरोपी असिफचा मृत अनारकलीच्या मुलीसोबत विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर आरोपी जावई आणि मृत सासू यांची जवळीक वाढली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. यातूनच हे दोघं कर्नाटकातून पुण्याला पळून आले. पुण्यात आल्यानंतर असिफ मजुरीचं काम करू लागला. यातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. पण दरम्यान त्यांच्यात सातत्यानं खटके उडू लागले. पळून आलेल्या सासू आणि जावयामध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होऊ लागली.

हे ही वाचा-आई-पत्नीच्या भांडणाला वैतागला मुलगा; आधी जन्मदातीला गळा दाबून संपवलं आणि मग...

या सततच्या भांडणाला कंटाळून संतापलेल्या असिफने आपल्या सासूची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्यानं घराला कुलुप लावलं आणि तेथून पळ काढला. पळून जाण्यापूर्वी आरोपी जावयानं आपल्या एका मित्राला सासूची हत्या केल्याचं सांगितलं. मित्रानं ही बाब बिबवेवाडी पोलिसांच्या कानावर घातली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलतं कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी जावयाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 9:34 AM IST

ताज्या बातम्या