मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जावयाने दारूच्या नशेत सासरी घातला धुमाकूळ; मेव्हण्याच्या खोलीत शिरला अन्...

जावयाने दारूच्या नशेत सासरी घातला धुमाकूळ; मेव्हण्याच्या खोलीत शिरला अन्...

यानंतर जावयाची थेट पोलिसात रवानगी करण्यात आली.

यानंतर जावयाची थेट पोलिसात रवानगी करण्यात आली.

यानंतर जावयाची थेट पोलिसात रवानगी करण्यात आली.

  • Published by:  Meenal Gangurde

रायपूर, 14 फेब्रुवारी : छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) बिलासपुरमध्ये दारूच्या नशेत जावई सासरी गेला आणि तेथे गोंधळ घातला. जावयाने येथील महिलेसोबत गैरव्यवहार केला. येथील महिलेने आरडाओरडा सुरू केला आणि विरोध केला. यानंतर जावई सासरहून पळून गेला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही घटना सरकंडा पोलीस ठाणे हद्दातील आहे.

TI परिवेश तिवारीने सांगितलं की, लिंगियाडीह निवासी रामगोपाल यादव (28) प्राइवेट जॉब करतो. त्याला दारूचं व्यसन आहे. सरकंडा भागात त्याचं सासर आहे. रविवारी सायंकाळी साधारण 7 वाजता दारूच्या नशेत तो सासरी पोहोचला. यादरम्यान त्याने संधी साधत मेव्हण्याच्या 20 वर्षीय पत्नीच्या खोलीत शिरला आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. यानंतर महिला आरडाओरडा करू लागली. विरोध केल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. महिलेने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. आणि पोलिसात जाऊन तक्रार केली.

हे ही वाचा-प्रत्येक स्पर्श वाईट नसतो', विनयभंगाच्या गुन्ह्यात न्यायालयाचा मोठा निर्णय

पत्नीनेही दिला वहिनीला पाठिंबा...

या घटनेची माहिती आरोपी रामगोपाल याच्या पत्नीला मिळाली. पतीचं कृत्य ऐकल्यानंतर तिनेही आपल्या वहिनीची बाजू घेतली. तिने पोलिसांना सांगितलं की, तिच्या पतीविरोधात कडक कारवाई केली जावी. सांगितलं जात आहे की, ज्यावेळी आरोपी रामगोपाल आपल्या मेव्हण्याच्या घरी पोहोचला, त्यावेळी मेव्हणा घरी नव्हता. त्याच्या पत्नीला एकटं पाहून तो जबरदस्ती करू लागला.

First published:

Tags: Chattisgarh, Crime, Wife and husband