मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जावयाची फर्मानं ऐकून आला वैताग, मेहुणा आणि सासूनं काठीने दिला प्रसाद

जावयाची फर्मानं ऐकून आला वैताग, मेहुणा आणि सासूनं काठीने दिला प्रसाद

आपला आणि आपल्या (Son in law beaten by mother in law and brother in law) भावाचा शाही पाहुणचार करण्याची मागणी करणाऱ्या जावयाला त्याची सासू आणि मेहुण्याने काठीने बदडून काढल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 23 नोव्हेंबर: आपला आणि आपल्या (Son in law beaten by mother in law and brother in law) भावाचा शाही पाहुणचार करण्याची मागणी करणाऱ्या जावयाला त्याची सासू आणि मेहुण्याने काठीने बदडून काढल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. कामावर जायला (Fight at in law’s place) वेळ असल्यामुळे सहज म्हणून सासूरवाडीला आलेला जावई सासू आणि मेहुण्याला वाट्टेल त्या ऑर्डर सोडत सूचना करू लागल्या. यामुळे संतापलेल्या दोघांनी त्याचा पाणउतारा करत बेदम मारहाण केली.

भावासमोर बडेजाव

राजस्थानधील धौलपूर भागात राजेश नावाच्या 25 वर्षांच्या तरुणाची सासूरवाडी होती. मजुरीची कामं करणारा राजेश त्या रात्री बाहेरगावी कामासाठी जाणार होता. मात्र बसला वेळ असल्याने तो सासूरवाडीला गेला. त्याच्या सोबत त्याचा चुलत भाऊदेखील होता. दिवसभर बाहेर थांबवण्याऐवजी आपल्या सासूरवाडीत जाऊन जोरदार पाहुणचार झोडून येऊ, या बेताने दोघे सासूरवाडीला आले.

मद्यधुंद अवस्थेत वाद

सासूरवाडीत येण्यापूर्वी राजेशनं मद्यप्राशन केलं होतं. त्यामुळे दारुच्या नशेत त्याचा स्वतःवर ताबा नव्हता. सासूरवाडीत पोहोचल्यावर त्याने स्वतःसाठी आणि स्वतःच्या भावासाठी ऑर्डर सोडायला सुरुवात केली. या मुद्द्यावरून अगोदर सासूचे आणि त्याचे वाद झाले. त्यानंतर मेहुणादेखील या वादात पडला आणि नसत्या मागण्या पूर्ण होणार नसल्याचं त्यानं सांगितलं.

लाठ्याकाठ्यांनी हाणामारी

काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि प्रकरण हाणामारीवर आलं. सासू आणि मेहुण्यानं काठ्या घेऊन दोघांची धुलाई करायला सुरुवात केली. त्यांचा हा अवतरा पाहून राजेशच्या भावानं तिथून काढता पाय घेतला. मात्र राजेशला दोघांकडून चांगलाच प्रसाद मिळाला.

हे वाचा - धडाकेबाज राज्यमंत्री बच्चू कडू ! जलसंपदा विभागात धाड, कामचुकार अधिकाऱ्यांना दणका

पोलिसांची एन्ट्री

हा प्रकार समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी राजेशला उपचारांसाठी पाठवून दिलं दरम्यान, दोन्ही बाजूंकडून तक्रारच दाखल करण्यात न आल्यामुळे पुढे कारवाई करण्याचा प्रश्नच नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र दारुच्या नशेत जावयानं घातलेल्या गोंधळाची पंचक्रोशीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

First published:

Tags: Crime, Rajasthan