मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सासरा आणि सुनेने नात्याची मर्यादा ओलांडली; अखेर हत्यांकांडानेच झाला शेवट

सासरा आणि सुनेने नात्याची मर्यादा ओलांडली; अखेर हत्यांकांडानेच झाला शेवट

घरभर रक्त पसरलं होतं, यावेळी दोन्ही मुलं घरातच होते. या हत्याकांडानंतर घरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घरभर रक्त पसरलं होतं, यावेळी दोन्ही मुलं घरातच होते. या हत्याकांडानंतर घरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घरभर रक्त पसरलं होतं, यावेळी दोन्ही मुलं घरातच होते. या हत्याकांडानंतर घरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

(मध्य प्रदेश) भोपाळ, 3 जुलै : जबलपुरमधील एका गावातून खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. मुलानेच आपले वडील आणि पत्नीची हत्या केली आहे. हे कृत्य झाल्यानंतर आरोपी स्वत: काकाच्या घरी निघून गेला व त्यांना या घटनेबद्दल माहिती दिली. कुऱ्हाड घेऊन तो त्यांच्या घराच्या दारावर जाऊन बसला. आरोपीने सांगितलं की, पत्नीने दिलेला धोका आणि वडिलांच्या कृत्यावर राग व्यक्त केला होता. तीन दिवसांपूर्वी तरुणाने वडील आणि पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. यानंतर त्याने दोघांना समजावलंही होतं. (Son has killed his father and wife in an immoral relationship)

ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा जबलपूरपासून 65 किलोमीटर लांब बेलखेडातील गोकलाहार गावातील आहे. बेलखोडा टीआय सुनीत श्रीवास्तवने दिलेल्या माहितीनुसार, गावातील निवासी अर्जुन सिंह लोधीने डबल मर्डरची सूचना दिली. त्याने सांगितलं की, संतोष लोधीने (35) शुक्रवारी रात्री उशिरा वडील आणि पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली.

दरवाज्यावर कुऱ्हाड घेऊन बसून राहिला आरोपी

सूचना मिळताच बेलखोडा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली. संतोष लोधी रक्ताळलेली कुऱ्हाड घेऊन घराच्या दरवाज्यावर बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस घरात पोहोचले तेव्हा बेडवर वडील अमान सिंह लोधी (65) रक्ताळलेल्या अवस्थेत पडून होते. तर कविता लोधी (32) जमिनीवर पडली होती. दोघांचेही कपडे रक्ताने माखलेले होते. अख्ख्या घरात रक्त पसरलं होतं.

हे ही वाचा-सुधारगृहातील एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून देह विक्रय व्यवसायातील 10 तरुणींचं पलायन

दोघांनी मर्यादा ओलांडली, म्हणून केली हत्या

ताब्यात घेतलेला आरोपी संतोष लोधीने सांगितलं की, वडील आणि पत्नीने मर्यादा ओलांडली होती. त्यामुळे त्यांची हत्या केली. तीन दिवसांपूर्वी दोघांना आपत्तीजनक अवस्थेत पाहिलं होतं. त्यावेळी पत्नीची समजून काढली होती. मात्र तरीही शुक्रवारी रात्री दोघांनी सीमा ओलांडली. वडिलांना पत्नीच्या खोलीतून निघताना पाहून संतोष भयंकर चिडला. वडील त्यांच्या खोलीत निघून गेले. आरोपीने कुऱ्हाड उचचली आणि वडिलांच्या मानेवर फिरवली. वडिलांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पत्नीलादेखील निघृणपणे हत्या केली.

आरोपीला आहेत दोन मुलं

आरोपी संतोष लोधी आणि कवित लोधी यांच्या लग्नाला 15 वर्षे पूर्ण झाली होती. त्यांना 14 वर्षांचा मुलगा आणि 12 वर्षांची मुलगी आहे. या हत्याकांडानंतर घरात भीतीचं वातावरण आहे.

First published:

Tags: Crime news, Death, Madhya pradesh, Murder