Home /News /crime /

घृणास्पद! लेकाने आईला शिजवून खाल्लं, नंतर खाण्यासाठी काही तुकडे फ्रीजमध्ये साठवून ठेवले

घृणास्पद! लेकाने आईला शिजवून खाल्लं, नंतर खाण्यासाठी काही तुकडे फ्रीजमध्ये साठवून ठेवले

हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सर्वजणं हादरले.

    मॅड्रिड, 17 जून : स्पेनमधील (Spain) मॅड्रिडमधून (Madrid) आईची हत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका नरधमाने आपल्या आईचे कमीत कमी हजार तुकडे केले. (Son Chops Mother's Body In Thousand Parts) घृणास्पद म्हणजे यातील काही तुकडे त्याने खाल्लेसुद्धा. इतकच नाही तर त्याने नंतर खाण्यासाठी आईच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. वादानंतर अत्यंत निघृणपणे केली आईची हत्या डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, घटनेच्या एक दिवसाआधी त्याचा आईसोबत वाद झाला होता. यामुळे तो खूप नाराज झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने दोन चाकू आणले आणि आपल्या आईवर जीवघेणा हल्ला केला. त्याने आपल्या आईच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले. घटनेबद्दल माहिती मिळताच पोलीस आरोपीच्या घरी पोहोचली. पोलिसांना आरोपीच्या फ्रीजमध्ये शरीराचे छोटे छोटे तुकडे सापडले. आरोपीने आईच्या शरीराचे काही तुकडे प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून कचऱ्याच्या डब्यात फेकले होते. हे ही वाचा-वर्षभरात संपूर्ण कुटुंब संपलं; पतीच्या निधनानंतर महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या कोर्टाने दिली आरोपीला कडक शिक्षा पोलिसांनी सांगितलं की, 28 वर्षीय आरोपी तरुणाला फेब्रुवारी 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. ज्यानंतर एप्रिल 2021 पर्यंत कोर्टात त्याची ट्रायल सुरू होती. त्यानंतर कोर्टाने आरोपीला दोषी जाहीर करीत 15 वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय त्याच्यावर 73 हजार डॉलर म्हणजे तब्बल 53 लाख 80 हजार रुपयांचा दंड ठोठावला. आरोपीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी होता. पण खंडपीठाने त्यांचा युक्तिवाद नाकारला. हा गुन्हा माफ करता येणारा नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. त्याला कोणतीही सूट दिली जाऊ शकत नाही.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या