Home /News /crime /

VIDEO: वडिलांना मारहाण होताना मुलाने अमेरिकेतून लाईव्ह पाहिलं; Google वर सर्च केला पोलिसांचा नंबर अन् मग...

VIDEO: वडिलांना मारहाण होताना मुलाने अमेरिकेतून लाईव्ह पाहिलं; Google वर सर्च केला पोलिसांचा नंबर अन् मग...

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला ओळखीचाच एक व्यक्ती जेव्हा मारहाण करत होता (Man Beaten Old Transport Businessman), तेव्हा ते आपल्या कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या मुलासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते

    इंदूर 19 मार्च : एका मुलाने अमेरिकेतून गुगलवर इंदूर पोलिसांचा नंबर शोधला आणि मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मारहाण झालेल्या आपल्या वडिलांना वाचवलं. इंदूरमधील जुनी भागात ही घटना घडली. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला ओळखीचाच एक व्यक्ती जेव्हा मारहाण करत होता (Man Beaten Old Transport Businessman), तेव्हा ते आपल्या कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या मुलासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते. त्यामुळे मुलाने वडिलांसोबत होणारं हे गैरवर्तन थेट लाईव्ह पाहिलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र आरोपी फरार झाला होता. व्यावसायिकाने त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा भाजप नेत्याचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत आहे. पैशांसाठी गर्भवती पत्नीच्या जीवाशी खेळ, विवाहितेला उपाशी ठेवत पतीकडून अमानुष छळ या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 63 वर्षीय कैलाशचंद्र पारिक लोहमंडीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. शुक्रवारच्या रात्री दोनच्या सुमारास ते त्यांच्या कार्यालयाबाहेर बसले होते. ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणारा त्यांचा मुलगा अंकितसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते. दरम्यान, ओळखीचाच एक मुलगा चांदमल पारिक तेथे पोहोचला आणि कैलाशचंद्र यांच्यासोबत वाद घालू लागला. त्यांच्यात वाद वाढला आणि त्याने कैलास यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून कैलासचे कर्मचारी त्यांना वाचवण्यासाठी आले, मात्र आरोपी काहीही ऐकायला तयार नव्हता. तसंच त्याने कैलास यांना खुर्ची उचलून मारण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, कैलास यांचा मुलगा अंकित हा सर्व प्रकार फोनवर लाईव्ह पाहत होता. "माझ्यामुळे कुणाला तकलीफ नको...." video शूट करत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल वडिलांना थेट मारहाण होत असल्याचं पाहून त्याने गुगलवर इंदूर पोलिसांचा नंबर शोधला. नंबर मिळताच त्याने पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस कैलास यांच्या मदतीसाठी पोहोचले. मात्र, तोपर्यंत आरोपी तिथून पळून गेला होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Shocking video viral

    पुढील बातम्या