Home /News /crime /

कधी चुकीचा स्पर्श, तर कधी कपड्यावरून टिप्पणी; पुण्यातील बड्या IT कंपनीतील धक्कादायक वास्तव

कधी चुकीचा स्पर्श, तर कधी कपड्यावरून टिप्पणी; पुण्यातील बड्या IT कंपनीतील धक्कादायक वास्तव

Crime in Pune: पुण्यातील एका बड्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचा छळ (Molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पुणे, 08 मे: पुण्यातील एका बड्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीतील टीम लिडर पदावर (Team leader molest women) कार्यरत असणाऱ्या युवकानं गेल्या एक वर्षापासून या पीडित तरुणीचा शारिरीक आणि मानसिक छळ केला आहे. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी कंपनीतील मुख्य आरोपीसह सहा जणांविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संजय दास असं मुख्य संशयित आरोपीचं नाव असून तो विमाननगर परिसरातील रहिवासी आहे. या आरोपीसह कंपनीतील व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या अन्य सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवी कालिया, हिमांशू शर्मा, निताश कुटी, माक डिसिल्वा, इम्रान खान, हर्षवेंद्र सॉईन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी पुण्यातील एका बड्या कंपनीत टीम लिडर पदावर कार्यरत आहे. त्याने मार्च 2020 पासून एका 22 वर्षीय तरुणीचा छळ लावला आहे. पीडित तरुणीशी लगट करणे, तरुणीच्या कपड्यावरून अश्लील भाषेत टिप्पणी करणे, तिला स्पर्श करणे असे संतापजनक प्रकार त्यानं पीडितेशी केले आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीने कंपनीच्या व्यवस्थापनाकडे याची तक्रार केल्यानंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हे ही वाचा-धक्कादायक! पुण्यातील डान्स टीचरचं अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील वर्तन यानंतर आरोपींच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण ही घटना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यानं हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे. या घटनेची पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Sexual assault

    पुढील बातम्या