मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! सिंघू सीमेवर गोळीबार; शेतकरी आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न?

धक्कादायक! सिंघू सीमेवर गोळीबार; शेतकरी आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न?

(File Photo)

(File Photo)

Crime at Farmer Protest: रविवारी रात्री उशिरा काही अज्ञातांनी सिंघू बॉर्डरवर गोळीबार (Gun Firing at Singhu Border) केला आहे. टीडीआय सिटी जवळील लंगरमध्ये जेवणाच्या बहाण्याने कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी लंगरच्या ठिकाणी फायरींग (Firing) करून पसार झाले आहे

पुढे वाचा ...

सोनीपत, 08 मार्च : गेल्या 100 हून अधिक दिवसांपासून दिल्ली सीमेवर देशभरातील शेतकरी आंदोलन (Farmer Protest) करीत आहेत. रविवारी रात्री काही अज्ञातांनी सिंघू बॉर्डरवर गोळीबार (Gun Firing at Singhu Border) केल्याची घटना उघडकीस आली आहे. टीडीआय सिटी जवळीव लंगरमध्ये जेवणाच्या बहाण्याने कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी लंगरच्या ठिकाणी फायरींग करून पसार झाले आहेत. याप्रकरणी कुंडली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगड येथील पासिंग असणाऱ्या ऑडी कारमध्ये काही अज्ञात हल्लेखोर आले होते. त्यांनी लंगरमध्ये जेवणाचा आणि पाणी पिण्याचा बहाणा केला होता. त्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळावरच हवाई गोळीबार केला आहे. या संबंधितांनी थोड्या अंतरावर जावून तीन वेगवेगळ्या ठिकाणी हवेत गोळीबार केला आहे. शेतकरी आंदोलनात अशाप्रकराची हवाई फायरींग होणं, एक गंभीर गोष्ट आहे. अलीकडेच झालेल्या लाल किल्ला हिंसेमुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

शेतकरी आंदोलनाला गालबोट लावण्याचॉा प्रयत्न?

शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री उशिरा एका वाहनातून आलेल्या काही अज्ञातांनी टीडीआय सिटीसमोरील सिंघु सीमेसमोर हवेत गोळीबार केला आहे. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांत अंतर्गत वादाला सुरुवात करण्यासाठी हे कृत्य केलं असावं. हे कृत्य एका मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग असू शकतो. हे तरुण पंजाबमधील असल्याचं सांगण्यात येत होतं, तर त्यांनी हरियाणाच्या शेतकऱ्यांशी हुज्जत घातली आहे.

हे ही वाचा - Farmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन? 'ते' म्हणतात ही वैचारिक क्रांती

घटनास्थळी पोहोचलेल्या कुंडलीच्या एसएचओ रवी कुमार यांनी सांगितलं की, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी विशेष पथकंही तयार करण्यात आली आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेवून तपास केला जात आहे. याप्रकरणांत आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

First published:
top videos

    Tags: Farmer protest, Gun firing