भयंकर! चेटकीण असल्याचा आरोप करत महिलेला मारहाण, घरात घुसून झाडली गोळी

भयंकर! चेटकीण असल्याचा आरोप करत महिलेला मारहाण, घरात घुसून झाडली गोळी

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, चेटकीण असल्याचा आरोप करत सुरुवातीला काही लोकांनी महिलेला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात महिला जखमी झाली.

  • Share this:

पटना 09 मार्च : डिजीटल युगातही समाजातील काही भाग मात्र अद्यापही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी एक विचित्र घटना समोर आली आहे. चेटकीण (Witchcraft) असल्याचा आरोप करत काही लोकांनी या महिलेचा जबर मारहाण केली आहे. इतकंच नाही तर यानंतर घरात घुसून तिच्यावर गोळीही झाडली आहे. ही घटना बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील मुफस्सिल ठाणा क्षेत्राच्या भर्रा गावातील आहे.

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, चेटकीण असल्याचा आरोप करत सुरुवातीला काही लोकांनी महिलेला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात महिला जखमी झाली. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. महिलेचे कुटुंबीय या घटनेनंतर सदम्यात आहेत.

घटनेत गोळी लागल्यानं गंभीर जखमी झालेली महिला सुजा पंचायतच्या भुर्रा गावातील रहिवासी असलेल्या महेश्वर शर्मा यांची 54 वर्षीय विधवा पत्नी असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमध्ये महिला गंभीर झाल्यानं तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेची स्थिती सध्या अतिशय गंभीर आहे. मुफस्सिल ठाण्यातील पोलीस रुग्णालयात पोहोचले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Published by: Kiran Pharate
First published: March 9, 2021, 11:40 AM IST
Tags: attack

ताज्या बातम्या