मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /5 हजार रुपयांसाठी पत्नीला विकलं, पतीसमोर महिलेचे लचके तोडत राहिले दोन मित्र

5 हजार रुपयांसाठी पत्नीला विकलं, पतीसमोर महिलेचे लचके तोडत राहिले दोन मित्र

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

महिला स्वावलंबी झाल्या आहेत, मात्र आजही अनेक पुरुष आपल्या पत्नीला दासीसारखी वागणूक देत असल्याचं देशातील धक्कादायक वास्तव.

राजस्थान, 25 डिसेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) जयपुर येथे एका व्यक्तीने 5 हजार रुपयांसाठी आपल्या पत्नीला मित्रांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आरोपींनी पतीसमोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. पीडितेने पती आणि त्याच्या दोन्ही मित्रांविरोघात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. (Sold wife for 5 thousand rupees Two friends gang raped in front of husband )

पोलिसांनी सांगितलं की, 45 वर्षीय पीडितेची चहाची टपरी होती. 19 डिसेंबर रोजी तिचा पती दोन मित्रांसोबत टपरीवर आला होता. पतीने पाच हजार रुपयांत तिला विकलं. यानंतर त्याने पत्नीला काही दिवस मित्रांसोबत राहण्यासाठी सांगण्यात आलं. पत्नीने विरोध केला तर पतीने तिला मारहाण सुरू केली. मारहाणीनंतर तिला तेथेच एका खोलीत नेण्यात आलं व पतीच्या दोन मित्रांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

हे ही वाचा-72 वर्षांच्या प्रियकराने महिलेला हायवेवर फेकलं, तरीही 5 वेळा मृतदेहासमोरुनच गेला

जीवे मारण्याची दिली धमकी...

यादरम्यान पीडितेचा मुलगाही तिथं आलं. त्यानेही विरोध केला. मात्र यावेळी आरोपींनी त्यालाही मारहाण सुरू केली. पीडिता आणि तिच्या आरडाओरडा सुरू केल्यानंतर लोक जमा झाले. लोकांना येताना पाहून तिघेही आरोपी फरार झाले. जाताना मात्र त्यांनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेच्या मुलगा धक्कात..

या संपूर्ण घटनाक्रमानंतर पीडिता आणि तिच्या मुलाला धक्का बसला आहे. यानंतर मालपुरा गेट पोलीस ठाण्यात पोहोचले. महिलेने पतीसह त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात तक्रार दाखल केली. सध्या तिघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Gang Rape, Rajasthan