मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सोलापूर हादरलं! आधी पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने वार, मुलगा आणि मेहुण्याने काढला काटा

सोलापूर हादरलं! आधी पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने वार, मुलगा आणि मेहुण्याने काढला काटा

आरोपींचा फोटो

आरोपींचा फोटो

सोलापुरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर घरातील वादातून कुऱ्हाडीने वार केला. त्यानंतर या गोष्टीचा राग मनात घेवून संबंधित व्यक्तीच्या मुलगा आणि मेहुण्याने धक्कादायक कृत्य केलं.

    सोलापूर, 16 ऑगस्ट : घरात फार खटके उडू नये किंवा जास्त वाद व्हायला नको, असं म्हणतात. कारण घरात एखाद्या वेळेला वाद विकोपाला गेला तर अनपेक्षित घटना घडते. अशा अनेक घटना याआधी आपण पाहिल्या आहेत. आतादेखील अशाच काहिशा अनपेक्षित, धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे सोलापूर हादरलं आहे. सोलापुरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर घरातील वादातून कुऱ्हाडीने वार केला. त्यानंतर या गोष्टीचा राग मनात घेवून संबंधित व्यक्तीच्या मुलगा आणि मेहुण्याने धक्कादायक कृत्य केलं. सोलापूर जिल्ह्यात आईला दारू पिऊन मारहाण करतो म्हणून मुलाने वडिलांना नारळाच्या झाडाला बांधून मारहाण केली. त्यानंतर मेहुण्यानेही संबंधित व्यक्तीला काठीने मारहाण केली. मुलगा आणि मेहुणा यांनी मिळून संबंधित व्यक्तीने हत्या केली. या घटनेनंतर आरोपींनी गाडीवरुन पडून मृत्यू झाल्याची बनाव केला. मात्र पोलीस तपासात वडिलांचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी मंद्रूप पोलिसांनी मुलगा आणि मेहुणा या दोघांविरोधात 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई, गुजरातमधून एक हजार कोटींचं MD ड्रग्ज जप्त) सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे शिवाजी थोरात यांनी आपल्या पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून कुर्‍हाडीने पाठीवर मारले होते. आईला कुर्‍हाडीने मारुन जखमी केले म्हणून मुलगा तानाजी शिवाजी थोरात भडकला. त्याने वडिलांना झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केली. तसेच बहिणीला कुर्‍हाडीने मारल्याचा राग मनात धरुन शिवाजी थोरात यांचा मेहुणा भीमराव रामचंद्र जाधव याने थोरातांना शिवीगाळ करून त्यांना लाकडी काठीने दोन्ही हातावर, पायावर, मांडीवर, छातीवर मारहाण करून जीवे ठार मारले. शिवाजी थोरात यांच्या मृत्यूनंतर त्यांना घरी आणून पलंगावर झोपवण्यात आले. त्यांनतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दुचाकीवरून पडून वडिलांचा मृत्यू झाल्याची फिर्याद मुलाने दिली. मात्र पोलीस तपासात थोरात यांचा मृत्यू जबर मारहाण केल्याने निष्पन्न झाले. त्यानंतर मुलगा आणि मेहुणाविरोधात 302, 324, 342, 504, 34 प्रमाणे मंद्रूप पोलिसात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Crime, Solapur, Solapur news

    पुढील बातम्या