मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सोलापूर : स्वत:चे वाहन चोरीला गेलं म्हणून गड्यानं काय केलं पाहा, पोलिसांनी केल्या तब्बल 29 बाईक जप्त

सोलापूर : स्वत:चे वाहन चोरीला गेलं म्हणून गड्यानं काय केलं पाहा, पोलिसांनी केल्या तब्बल 29 बाईक जप्त

पोलिसांनी जप्त केलेली वाहने

पोलिसांनी जप्त केलेली वाहने

जुना बोरामणी नाका परिसरामध्ये चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी एक इसमे येणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India
  • Published by:  News18 Desk

प्रीतम पंडीत, प्रतिनिधी

सोलापूर, 4 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये प्रेयसीला फिरवण्यासाठी वाहन चोरीची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच वाहनचोरीचा प्रकार सोलापुरातून समोर आला आहे. पण पोलिसांना या वाहन चोरांना जेरबंद करण्यात यश आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या 29 मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई सोलापूर शहर गुन्हेने केली. यामध्ये तब्बल आठ लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर मच्छिंद्र भागवत जाडकर, सचिन जालिंदर चव्हाण (रा. खडकपूर मोडनिंब, ता.माढा) आणि दत्तात्रय रावसाहेब शेळके (रा. शिंदे शेळगी अरण, ता.माढा जि.सोलापूर) अशा या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जुना बोरामणी नाका परिसरामध्ये चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी एक इसमे येणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्याला सापळा लावून पकडले असता त्याने आपले नाव मच्छिंद्र भागवत जाडकर असे सांगितले.

तसेच सोलापूर परिसरातून त्याने आणि त्याचे दोन साथीदाराने मोटरसायकल चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. त्यांच्याकडून जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीत चोरीला गेलेल्या चोरीच्या 29 मोटारसायकल ज्यांची किंमत 8 लाख 45 हजार आहे, त्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली.

हेही वाचा - अनियंत्रित ट्रक पलटल्याने घडली भयानक घटना, ट्रकखालीच ड्रायव्हरचा मृत्यु तर क्लीनर...

स्वत:ची बाईक चोरीला गेली अन् गड्याने...

या टोळीच्या म्होरक्या याचे वाहन मार्केट यार्ड परिसरातून चोरीला गेले होते. त्यामुळे रागापोटी त्याने इतर साथीदारांच्या मदतीने एक-दोन नव्हे तर तब्बल 29 मोटारसायकली चोरल्या. तशी कबुलीही त्याने पोलिसांना दिली. राज्यात बाईक चोरीच्या घटनाही विविध भागात घडत असल्याचे यावरुन समोर आले आहे.

First published:

Tags: Bike, Crime news, Police, Robbery, Solapur