मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप, तरीही एमआयएमच्या शहराध्यक्षाला राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप, तरीही एमआयएमच्या शहराध्यक्षाला राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप, तरीही एमआयएमच्या शहराध्यक्षाला राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप, तरीही एमआयएमच्या शहराध्यक्षाला राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणारे एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तोफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

  • Published by:  Chetan Patil
प्रितम पंडित,सोलापूर, 12 ऑगस्ट : गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातलं नातं लपून राहिलेलं नाही. जनतेच्या हितासाठी राजकारण केलं तर जनता ही लोकप्रतिनिधींना चांगला आशीर्वाद देते. पण जनतेचा विचार न करता गुन्हेगारीचा मार्ग अवलंबा तर त्याचे परिणाम त्या त्या लोकप्रतिनिधींना भोगावा लागतात. अर्थात या गोष्टी तसं कृत्य करणाऱ्या मोजक्या लोकप्रतिनिधींपुरता मर्यादित आहेत. महाराष्ट्रात चांगल्या लोकप्रतिनिधींची संख्या अधिक आहे. पण अराजकतेच्या मार्गावर चालणारे राजकारणी नाहीत, असं म्हणता येणार नाही. या राजकारण्यांवर झालेलं गंभीर आरोप खरंच सिद्ध झाले आहेत, असंही नाही. काहीजण आरोपांमुळे जेलमध्ये जावून येतात आणि नंतर पुन्हा नव्याने आयुष्य जगतात. सोलापुरात तसंच अराजकतेची कास पकडल्याचा आरोप असणाऱ्या एका एमआयएमच्या नगरसेवकाला राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पक्षाच्या विस्तारासाठी पक्षात सामावून घेण्याचा हात दिला आहे. या नगरसेवकाला राष्ट्रवादीने प्रवेश दिला आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकावर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप आहे. सोलापूर शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणारे एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तोफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तोफिक शेख यांच्यासह एमआयएम पक्षाच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे एमआयएम पक्षाला सोलापुरात मोठे खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत MIM पक्षाच्या 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तौफिक शेख, तस्लीम शेख, नुतन गायकवाड, पुनम बनसोडे, वाहिदाबानो शेख, शहाजीदा शेख हे MIM नगरसेवक आज राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. (MIM ला सोलापूरात मोठं खिंडार; 6 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश मात्र काँग्रेससमोरील आव्हान वाढलं!) 2017 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन एमआयएम पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष तोफिक शेख यांनी 9 नगरसेवक निवडून आणले होते. दरम्यान विजापूर येथील कॉंग्रेस महिला पदाधिकाऱ्याच्या खुनाच्या आरोपात तोफीक शेख हे कारागृहात होते. याशिवाय सोलापूर शहरात तोफिक शेख यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्हे दाखल असलेल्या शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रवेश दिला आहे. तोफिक शेख यांची काँग्रेससोबत चांगलीच खुन्नस आहे. त्यामुळे त्यांना कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाते. शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेख यांनी अंतर्गत राजकीय वादामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
First published:

Tags: Jayant patil, NCP

पुढील बातम्या