मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /7 वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर लग्न करताना पोलिसांचा कडक पाहारा; कारण वाचून बसेल धक्का

7 वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर लग्न करताना पोलिसांचा कडक पाहारा; कारण वाचून बसेल धक्का

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

ही घटना फिल्मी वाटत असली तरी ती पूर्णपणे खरी आहे.

    पाटना, 10 मार्च : एखाद्या व्यक्तीवर एकतर्फी प्रेम (one sided love) असणारी लोकं काय करतील याचा नेम नाही, असं म्हणण्याचं कारण म्हणजे बिहारमध्ये (Bihar) घडलेली एक घटना. या घटनेत एका प्रेमी युगुलाला लग्न करायचं होतं मात्र ते तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका तरुणामुळे लग्न करू शकत नव्हते. प्रकरण इतकं वाढलं की शेवटी या प्रेमी युगुलाने लग्न करण्यासाठी पोलिसांची (police help) मदत घेतली. ही घटना फिल्मी वाटत असली तरी ती पूर्णपणे खरी असून, बिहारच्या दानापूर भागात घडली आहे.

    झालं असं की दानापूरच्या पीएससीएच भागात राहणाऱ्या एका तरुणीचे त्याच भागातील एका तरुणाशी सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांना लग्न करायचं होतं आणि त्यांच्या या निर्णयाला दोघांच्या कुटुंबीयांचीदेखील (family) मंजुरी होती. पण तरी ते दोघं लग्न करू शकत नव्हते, कारण या तरुणीवर एका दुसऱ्या मुलाचं एकतर्फी प्रेम होतं. तो मुलगा या तरुणीला धमकावत होता. तुम्ही जर लग्न केलं तर तुम्हाला सुखाने जगू देणार नाही, तुम्हा दोघांसह तुमच्या कुटुंबीयांनाही जीवे मारेन, अशा धमक्या हा तरुण द्यायचा. सुरुवातीला फक्त तरुणीला त्रास देणाऱ्या या एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची हिंमत इतकी वाढली की नंतर तो तिच्या कुटुंबीयांनादेखील त्रास देऊ लागला. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

    या तरुणाच्या सततच्या धमक्यांमुळे हे प्रेमी युगुल चांगलंच तणावात होतं. अनेकदा तर हा तरुण मुलीच्या घरी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास द्यायचा. तर बऱ्याचदा त्याने पोलिसांना (police) फोन करत या तरुणीच्या घरात दारू लपवली असल्याची खोटी माहिती दिली. त्यामुळे या तरुणीच्या घरच्यांना पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. या तरुणाला वैतागलेल्या प्रेमी युगुलाने शेवटी पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं.

    हे ही वाचा-फोटो काढायला गेले अन् नियतीच्या फ्रेममध्ये झाले कैद; 6 फोटोग्राफर्सचा करुण अंत

    प्रेमी युगुलाने पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर फुलवारी पोलीस ठाण्याचे प्रमुख रफीकुल रहमान यांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलवून पोलीस संरक्षणात दोघांचं लग्न लावून दिलं. माजी नगरसेविका कोळेश्वरी देवी यांच्या उपस्थितीत या प्रेमी युगुलाचा पोलीस संरक्षणात विवाह (marriage) झाला. पोलिसांची मदत मिळाल्यानंतर दोघांनीही आनंदात लग्न केलं. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या एकतर्फी प्रियकराचा शोध सुरू केला आहे.

    First published:

    Tags: Bihar, Marriage