मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुंबईनगरीला ड्रग्स माफियांचा विळखा, तब्बल 100 कोटींची झाली तस्करी!

मुंबईनगरीला ड्रग्स माफियांचा विळखा, तब्बल 100 कोटींची झाली तस्करी!

अंमली पदार्थ विरोधी पथकाने या कारवायांमध्ये तब्बल 364 किलो 244 ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे, या ड्रग्सची किंमत 19 कोटी 20 लाख इतकी आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने या कारवायांमध्ये तब्बल 364 किलो 244 ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे, या ड्रग्सची किंमत 19 कोटी 20 लाख इतकी आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने या कारवायांमध्ये तब्बल 364 किलो 244 ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे, या ड्रग्सची किंमत 19 कोटी 20 लाख इतकी आहे.

मुंबई, 30 नोव्हेंबर : मुंबई (Mumbai) हे ड्रग्स विक्रीचा प्रमुख केंद्र झाले असून इथे उच्चभ्रू सोसायट्यांपासून ते झोपडपट्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ड्रग्स (drugs smuggler) खरेदी विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. ड्रग्स माफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना फार मोठी कसरत करावी लागते आणि म्हणूनच सध्या ड्रग्स माफिया किंवा पेडलर्सच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मोहिमच उघडली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोटयवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करून शेकडो आरोपींना तुरुंगात पाठवले आहे.

मुंबई ही नेहमीच दहशतवाद्यांसोबतच ड्रग्स माफियांच्या टार्गेटवर राहिली आहे. कारण, या मुंबईत दहशतवादी हल्ले करुन आर्थिक नुकसान करण्याचे मनसुबे पाळले जातात तर याच मुंबईत ड्रग्स विकून ड्रग्स माफिया अरबो खरबो रुपये कमवतात. दोन्ही बाजूने मुद्दा आहे तो पैशांचा त्यामुळे मुंबई ही सतत ड्रग्स माफियांसाठी केंद्र बिंदूच राहिली आहे.

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरात 35 कारवाया करत 47 आरोपींना अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या कारवायांमध्ये तब्बल 364 किलो 244 ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे, या ड्रग्सची किंमत 19 कोटी 20 लाख इतकी आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरात ड्रग्सविरोधात 120 कारवाया केल्यात.

या सगळ्या कारवायांमध्ये 135 आरोपींना अटक करून त्यांच्यावर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 4 कोटी 23 लाख रुपयांचे ड्रग्स हस्तगत केले आहे. मुंबईत अरबो खरबो रुपयांच्या अंमली पदार्थांची उलाढाल झाली आहे. फक्त गेल्या 10 वर्षात मुंबईतून 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या ड्रग्सची तस्करी करताना ड्रग्स जप्त केले गेले आहे. जप्त केले गेलेले हे ड्रग्स तर मुंबईतील ड्रग्सच्या अरबो खरबो रुपये उलाढालीच्या हिमनगाचे फक्त टोक आहे.

खरंतर ड्रग्स माफियांवर असलेला राजकीय नेते आणि पोलिसांचा वरदहस्त यामुळेच ड्रग्स माफिया बिनधास्त मुंबईत ड्रग्स विकतात. पण हाच ड्रग्सचा पैसा मुंबईवरच दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे मुंबई सतत दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असते.

First published:

Tags: Drugs, Mumbai police