• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • 6 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण, वडिलांकडे मागितली 50 लाखांची खंडणी

6 वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण, वडिलांकडे मागितली 50 लाखांची खंडणी

Gorakhpur Crime: महाराजगंज (Maharajganj) जिल्ह्यातील बैजोली गावात राहणाऱ्या पियूष गुप्ता (Piyush Gupta) यांना गुरुवारी संध्याकाळी धमकीचं पत्र आलं, ज्यामध्ये अपहरणकर्त्यांनी 50 लाखांची खंडणी (Extortion) मागितली आहे.

 • Share this:
  गोरखपूर, 12 डिसेंबर: NCRB च्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हे राज्य देशात सर्वात जास्त गुन्हेगारी (Crime) असलेलं राज्य आहे. देशातील एकूण गुन्ह्यांपैकी 15.2 टक्के गुन्हे हे एकट्या उत्तर प्रदेशात घडतात. दिवसागणिक येथील गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यात आणखी भर पडली उत्तरप्रदेशातील महाराजगंज (Maharajganj) जिल्ह्यातील बेजौली या गावातून सहा वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करण्यात आलं असून अपहरणकर्त्यांनी 50 लाखांची खंडणी मागितली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास पियूष गुप्ता आणि त्यांचा मुलगा दीपक गुप्ता घरासमोर मोबाईल घेऊन खेळत होते आणि खेळत असताना अचानक दीपक गायब झाला. त्यानंतर आई-वडिलांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला पण तो काही सापडला नाही. मग त्यांनी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गुरुवारी संध्याकाळी वडिलांना धमकीचं पत्र आलं, ज्यामध्ये अपहरणकर्त्यांनी 50 लाखांची खंडणी मागितली होती, अशी माहिती पियूष गुप्ता यांनी पोलिसांना दिली. त्यांनी पुढे असंही सांगितलं की त्याचं कोणाशीही वैर नाही. वरिष्ठ पोलीस अधीक्षक, प्रदीप गुप्ता यांनी सांगितलं, की पोलिस अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत आहेत आणि खंडणीच्या पत्राचीही गंभीर दखल घेतली आहे. आम्ही लवकरात लवकर मुलाचा शोध घेऊ आणि आरोपींना अटक करू असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. पोलीस कुटुंबातील अन्य सदस्यांच्या मोबाइलवर नजर ठेवून आहेत. यासाठी पोलिसांची एकूण चार पथकं या मुलाचा शोध घेत आहेत. हे वाचा-गंभीर आजाराशी दोनहात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली टोमॅटोची नवी जात झारखंडमध्येही एका शेतकऱ्याचं अपहरण झारखंडमध्येही एक अपहरणाची घटना घडली आहे. पलामू जिल्ह्यातील पनकी पोलिस स्टेशन परिसरात गुन्हेगारी टोळीनं एका शेतकऱ्याचं अपहरण केलं आहे. अपहरणकर्त्यांनी फोन करून शेतकरी कुटुंबाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी FIR नोंदवला असून दोषींना अटक करण्यासाठी तातडीची पाऊलं उचलली जात आहेत. अपहरण झालेल्या शेतकऱ्याचं नाव विश्वनाथ यादव असं आहे. मोबाइल लोकशनच्या आधारे पोलिस गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: