Home /News /crime /

भावोजींच्या प्रेमात वेड्या झालेल्या मेव्हणीने पतीचं केलं अपहरण आणि मग...

भावोजींच्या प्रेमात वेड्या झालेल्या मेव्हणीने पतीचं केलं अपहरण आणि मग...

अटॅचमेंटच्या भावनेत ऑक्सिटोसिन हॉर्मोन वाढतात. ऑर्गेजममध्ये ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो. हेच एकमेकांबद्दल ओढ निर्माण करतं.

अटॅचमेंटच्या भावनेत ऑक्सिटोसिन हॉर्मोन वाढतात. ऑर्गेजममध्ये ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो. हेच एकमेकांबद्दल ओढ निर्माण करतं.

भावोजींच्या प्रेमात वेड्या झालेल्या मेव्हणीने आपल्याच पतीचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...

    नवी दिल्ली, 14 एप्रिल: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात (Purnia district) एक वेगळाच आणि धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. आपल्या भावोजींच्या प्रेमात वेड्या झालेल्या मेव्हणीने आपल्याच पतीची हत्या (murder) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह इतर चौघांना अटक केली आहे. पूर्णिया जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कालीगंज येथून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांनी सायकलस्वार व्यक्तीचं अपहरण (Kidnapped) केलं. अपहरणकर्त्यांनी त्याला धमदाहा येथे नेत असताना वाटेतच गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर मृतदेह हा धमदाहा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुलसी कुडीया येथे फेकून दिला. तुलसी कुडीया येथे एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतक बाबुलच्या आईने बाबुलच्या पत्नीवर आरोप केला. बाबुलच्या आईने म्हटलं की, बाबुलच्या पत्नीचे आपल्या भावोजींसोबत अनैतिक संबंध होते. यावरुन पंचायत सुद्धा बसवण्यात आली होती मात्र, पंचायतीसमोर तिच्या भावोजींनी असं काही नाहीये म्हटलं. बाबुलच्या मावशीने म्हटलं की, बाबुलचा साडू मोहम्मद चांद नेहमीच त्यांच्या घरी येत असे. घरी कुणी नसल्याचं पाहून त्यांचे अश्लिल कृत्य सुरू होत असत. जेव्हा बाबुलने याला विरोध केला तेव्हा बाबुलची पत्नी आणि तिच्या भावोजींनी बाबुलचं अपहरण करुन त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. वाचा : ऑक्सिजन अभावी 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची Fake FB पोस्ट टाकणं पडलं महागात 8 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह मुफस्सिल पोलीस स्टेशनचे प्रभारी आदित्य रंजन यांना बाबुल याच्या अपहरणाची माहिती मिळाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना बाबुलचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी बाबुलची पत्नी, तिचे भावोजींसह चौघांना या प्रकरणात ताब्यात घेतलं. यानंतर चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला. ज्या स्कॉर्पिओतून बाबुलचं अपहरण करण्यात आलं होतं ती सुद्धा जप्त करण्यात आली आहे. बाबुलचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
    First published:

    Tags: Crime, Murder

    पुढील बातम्या