नांदेड, 30 मार्च: सध्या देशात कोरोना विषाणू (Corona virus) वेगाने फोफावत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अधिक चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी कोरोनाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशातच होळीचा सणाच्या (Holi Festival) निमित्ताने राज्यात कोरोना पसरू नये म्हणून कोरोना नियम पाळून होळी साजरी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी होळी सणाच्या निमित्ताने हरताळ फासला गेला आहे. तर नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केली असताना, अनेकांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसवलं आहे.
सोमवारी नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर (Attack on police in Gurudwara) हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुद्वारा बोर्ड पदाधिकार्यासह 400 जणांवर गुन्हा दाखल (FIR lodged against 400 people) करण्यात आला आहे. वाजीराबाद पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आता व्हिडीओच्या साह्याने हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 16 जणांना अटक (16 arrested) करण्यात आली आहे. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.
(संबंधित-VIDEO : लॉकडाऊनमध्ये मिरवणुकीचं आयोजन, विरोध केला म्हणून पोलिसांवर हल्ला)
नेमकं प्रकरण काय आहे?
नांदेड येथील गुरुद्वारातून दरवर्षी होळीच्या निमित्ताने हल्ला महला मिरवणूक (Halla Mahala Procession) काढली जाते. पण यावर्षी कोविडमुळे नांदेड जिल्ह्यात लॉक डाऊनआहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळ आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. असं असताना देखील काल गुरद्वारा परिसरात मोठ्या संख्येने शीख बांधवांचा जमाव जमला होता. तसेच त्यांनी हल्ला महला मिरवणूक काढण्याचा हट्ट धरला होता.
(हे वाचा- नांदेडजवळ 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार)
त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर गुरुद्वारा परिसरातील जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. यामध्ये हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोडही केली. होळी सणाला गालबोट लावणाऱ्या या दुर्घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी आहेत. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीना अटक करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी व्हिडीओ पाहून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. या घटनेचा वाढता तणाव लक्षात घेता नांदेडचे पालकमंत्री आज शहरात येणार असून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची बैठक घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack, Crime news