मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

थर्टी फस्टच्या रात्री शूटआऊट, घरात घुसून अज्ञातांनी महिलेच्या चेहऱ्यावर झाडली गोळी...

थर्टी फस्टच्या रात्री शूटआऊट, घरात घुसून अज्ञातांनी महिलेच्या चेहऱ्यावर झाडली गोळी...

रक्ताळलेल्या अवस्थेत महिला जागीच कोसळली.

रक्ताळलेल्या अवस्थेत महिला जागीच कोसळली.

रक्ताळलेल्या अवस्थेत महिला जागीच कोसळली.

  • Published by:  Meenal Gangurde

रायपूर, 1 जानेवारी 2022 : छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) कोरबामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होण्याच्या 45 मिनिटांपूर्वी शुक्रवारी रात्री उशिरा दोन तरुणांनी घरात घुसून एका महिलेवर गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. यानंतर बाईकवर बसून दोघेही फरार झाले. गोळी महिलेच्या चेहऱ्यावर लागली आहे. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. सूचना मिळताच पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. अद्याप आरोपींचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाबर निवासी महिला सरोजनी बाई (25) शुक्रवारी रात्री घरात होते. तर तिचा पती सनी बाहेर गेला होता. सांगितलं जात आहे की, रात्री साधारण 11.15 वाजता 2 अज्ञात घरात घुसले आणि सरोजनीवर गोळीबार केला. गोळी सरोजनीच्या चेहऱ्यावर लागली आणि रक्तबंबाळ अवस्थेत ती जमिनीवर कोसळली. यानंतर आरोपी बाईकवर बसून फरार झाले. शेजारी गोळीचा आवाज ऐकून तेथे आले. आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं.

गोळी मारणाऱ्यांचा शोध सुरू...

जखमी महिलेला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. येथील डॉक्टरांनी महिलेला मोठ्या रुग्णालयात रेफर केलं. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून अद्यापही ती बेशुद्ध अवस्थेत आहे. या प्रकरणात महिलेच्या पतीने सांगितलं की, तो बाहेर गेला होता. यादरम्यान दोन वेळा पत्नीने त्याला कॉल केला. तिसऱ्यांदा जेव्हा तिने कॉल केला तेव्हा तीन अज्ञात घरात घुसल्याचं सांगितलं. यानंतर गोळीचा आवाज आला. जेव्हा पती तेथे पोहोचला तेव्हा ती रक्ताळलेल्या अवस्थेत होती. तिच्या कानातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने पळवून नेण्यात आले होते.

हे ही वाचा-50 रुपयांसाठी पोटच्या मुलाला मारहाण, डोक्याची कवटी फुटल्याने तडफडून मृत्यू

या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, जखमी महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिला शुद्धीवर आल्यानंतर तिची चौकशी केली जाईल. तर दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी अवैधपणे गांज्याची खरेदी-विक्री करीत होता. त्यामुळे घरात अज्ञातांची ये-जा सुरू होती. पोलीस या पैलूचाही तपास करीत आहे.

 

First published:

Tags: Chattisgarh, Crime news