Home /News /crime /

एकमेकांच्या जीवावर उठले सख्खे भाऊ, असे भांडले की एकाचवेळी दोघांचा पडला मृतदेह

एकमेकांच्या जीवावर उठले सख्खे भाऊ, असे भांडले की एकाचवेळी दोघांचा पडला मृतदेह

दोन्ही भावांना एकाच वेळी गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    नवी दिल्ली, 16 मार्च : 'सख्खे भाऊ पक्के वैरी' ही म्हण तुम्हा सगळ्यांना माहित आहेच. अगदी या म्हणीला खरं करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून दोन भावांचा असा काही वाद झाला की दोघांनाही एकाक्षणी जीव गमावण्याची वेळ आली आहे. दोन्ही भावांना एकाच वेळी गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही भावांनी एकमेकांना गोळ्या घातल्या. मिळालेल्या वृत्तानुसार, तनुज नागर (वय 27) याचा रात्री 12 च्या सुमारास त्याचा स्वत: चा भाऊ राहुल नागर (34) याच्याशी भांडण झालं. यात तनुजने आपला भाऊ राहुल याला थेट पिस्तुलाने गोळ्या घातल्या. दरम्यान, राहुलनेही तनुजवर गोळी झाडली. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. राहुल कोर्टात शिपाई म्हणून काम करायचा अशी माहिती समोर आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हे वाचा - एका क्लिकवर मिळवा कोरोनाबाबत अचूक माहिती, भारताने तयार केली खास वेबसाईट दिल्लीच्या सिव्हिल लाइन भागात ही घटना घडली आहे. दुसरीकडे, पुल प्रह्लादपूरमध्ये सोमवारी पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात चकमकी झाली. सकाळी दोन चोरटे या चकमकीत ठार झाले. राजा कुरेशी आणि रमेश असं या दरोडेखोरांचं नाव आहे. दोघेही खून प्रकरणात आरोपी होते. या क्षणी, दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दोन कुरघोडी करणारे राजा कुरेशी आणि रमेश यांना प्रह्लादपूर भागात पुलावरून घेरलं होतं. दोघांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी केलेल्या गोळीबारात दरोडेखोरांना गोळ्या घालण्यात आल्या आणि दोघे जखमी झाले. नंतर दोघांचा मृत्यू झाला. चकमकीत ठार झालेल्या राजा कुरेशी आणि रमेश या दोघांवर दिल्ली आणि उत्तर प्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद भागात अनेक घटना घडवून आणल्या. हे वाचा - शहीद वडिलांच्या अंत्यसंस्काराला चिमुकला गाऊ लागला 'गोल-गोल रानी..', अश्रू अनावर
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Delhi crime

    पुढील बातम्या