भरतपुर, 7 नोव्हेंबर : भरतपुर (Bharatpur News) पोलीस ठाणे हद्दातील सुभाष नगर भागात रविवारी दोन भावांनी शेजारी राहणाऱ्या वडील आणि मुलाला जीवे (Murder) मारलं. आरोपींनी शेजारच्यांच्या घरात घुसून गोळीबार (Firing) केला. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यात आरोपी मृतांच्या घराबाहेर निघताना दिसत आहे. सोबतच व्यक्तीच्या हातात हत्यार असल्याचंही दिसत आहे.
मृत व्यक्तीचा भाऊ चंदनने सांगितलं की, त्याचा लहान भाऊ सुरेंद्र हा सुभाष कॉलनीत राहत होता. सुरेंद्रचा मुलगा सचिन भरतपूरमध्ये राहून NDA ची तयारी करीत होता. शनिवारी रात्री सुरेंद्रच्या घरीत त्याने नातेवाईक आले होते. यादरम्यान नातेवाईकाचा मुलगा आणि सुरेंद्रच्या शेजारच्यांमध्ये काही गोष्टीवरुन वाद झाला. यानंतर सुरेंद्रच्या घरातील पाहुण्याने शेजारील लाखनच्या मुलाच्या कानशिलात लगावली आणि तेथून फरार झाला.
हे ही वाचा-घृणास्पद! दिवाळीच्या रात्री दारूच्या नशेत मुलाने सख्ख्या आईवर केला बलात्कार
शनिवारी सुरेंद्रच्या घरात केली फायरिंग..
घटनेनंतर लाखनने काही वेळ सुरेंद्रच्या घरावर फायरिंग केली. मात्र सुरेंद्र आणि त्याचा मुलगा घराबाहेर आले नाहीत. शनिवारी लाखनने केलेल्या फायरिंगबद्दल पोलिसांना कळवण्यात आलं. यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांनी कोणालाही ताब्यात घेतलं नाही. शेजारच्यांनी सांगितलं की,पोलीस परिसरात फेरी मारून निघून गेले.
आज सकाळी पुन्हा सुरेंद्र आणि लाखनमध्ये वाद झाला. यानंतर लाखनने घरातून बंदूक आणली आणि सुरेंद्रच्या पायावर आणि जांघेत गोळी घातली. सचिन बाहेर गेला होता आणि तो घरात शिरत असताना लाखनने सचिनलाही गोळी घातली आणि तो फरार झाला. यादरम्यान सुरेंद्र आणि त्याचा मुलगा सचिन यांचा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Rajasthan