धक्कादायक! मेळघाटात कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू

धक्कादायक! मेळघाटात कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोरोना बाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा (Witch treatment on corona patient in Melghat) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

अमरावती, 17 एप्रिल: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा मेळघाट परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अंद्धश्रद्धेला खातपाणी घालणाऱ्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून मेळघाटात कोरोनाबाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा (Witch treatment on corona patient in Melghat) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू (Corona patient death) झाल्यानं ही घटना समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी मेळघाटातील सेमाडोह आरोग्य केंद्रात एका 45 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार करायचे सोडून नातेवाईक महिलेला उपचारासाठी मंत्रिकाकडे घेऊन गेले. मांत्रिकानेही संबंधित कोरोनाबाधित महिलेवर उपचार केले. पण उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा-'बेड द्या, नाहीतर बापाला मारुन टाका'; वडिलांच्या उपचारासाठी मुलाचा संघर्ष

स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरदेखील आजही मेळघाटात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात बाळगली जात आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. या घटनेची माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितलं की, मेळघाटात यापूर्वी अनेक अशा अंधश्रद्धेच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी आरोग्य विषयक जनजागृती होणं खूप महत्त्वाचं आहे.

हे ही वाचा- पुण्यात 'डोंगरबाबा'चा उच्छाद; कोरोनाची भीती घालून पोखरला डोंगर

दुसरीकडे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत मोळघाटात अनेक जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. मात्र अद्याप याठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा सचिव हरिष केदार यांनी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 4:30 PM IST

ताज्या बातम्या