Home /News /crime /

Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

ट्रेनची गती जास्त होती. त्यामुळे तरुण खाली पडला तर अक्षरश: बॉलसारखा उडाला.

    मुंबई, 23 जून : रेल्वे अपघाताचा (Railway Accident) एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. रेल्वेच्या डब्यांना लटकू नका असं वारंवार आवाहन केलं जात असतं. मात्र तरीही काही अतिउत्साही तरुण ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करतात. परिणामी अनेक अपघातात प्रवाशांचा मृत्यू होतो. त्यामुळे कोणीही नको तो स्टंट करू नये असं रेल्वे  विभागाकडूनही सांगितलं जातं. चालत्या ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. दादरला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमधील एक तरुण गाडीतून खाली पडला. यावेळी गाडीची गतीही जास्त होती. आज साधारण 9.30 वाजता कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वे पोलिसांनीही या प्रकरणात तपास केला आहे. हा व्हिडीओ इतका भयंकर आहे जो इथं दाखवू शकत नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Accident, Indian railway, Shocking viral video, Train accident

    पुढील बातम्या