Home /News /crime /

संतापजनक VIDEO! कोंबडीच्या पिल्लाची शिकार केली म्हणून मांजरीची डोक्यात गोळी घालून हत्या

संतापजनक VIDEO! कोंबडीच्या पिल्लाची शिकार केली म्हणून मांजरीची डोक्यात गोळी घालून हत्या

बराच वेळ मांजर जमिनीवर तडफडत होती. मात्र आरोपीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला नाही. जळगावातील या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जळगाव, 21 ऑक्टोबर : मांजरीने एका कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याने एका माथेफिरूने मांजरीची गोळी घालून हत्या (Cat shot and killed) केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात (Jalgaon News) घडला आहे. यादरम्याम मांजराच्या मालकाने यासंदर्भातील व्हिडीओ शूट केला होता. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Shocking Video Viral On Social Media) व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपण एका मुक्या जनावराला मारलं याची थोडीही लाज या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसली नाही. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निर्दयी माथेफिरूने केलेल्या कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागात राहणारे पुष्कराज बानाईत हे आपल्या परिवारासह येथे राहतात. परिसरात असलेल्या भटक्या मांजरीचे ते संगोपन करतात. बानाईत यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने कोंबड्या पाळल्या आहे. या कोंबड्याच्या एका पिल्लाची शिकार केल्याने बानाईत यांच्या बाजूला राहणाऱ्या माथेफिरूने छर्रेच्या बंदूकीद्वारे मांजरीच्या कपाळावर निशाणा साधत मांजरीचा जीव घेतला. हे ही वाचा-धक्कादायक! शाळेच्या पटांगणात शिक्षिकेचा मृतदेह पाहिल्यानंतर खळबळ दरम्यान मांजरीच्या कपाळावर गोळी लागल्याने मांजरीचा तडफडून मृत्यू झाला. सदर माथेफिरु विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे प्राणी प्रेमींनी या घटनेचा निषेध केला असून त्या व्यक्तीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांजर तडफडत आहे. दरम्यान आरोपी शेजारीच राहणारा असून त्याने थेट मांजरीच्या डोक्यात गोळी घातली. या घटनेची तीव्र निषेध केला जात आहे. एका मुक्या जनावरावर असे अमानुष अत्याचार करण्याच्या वृत्तीवर सवाल उपस्थित केला जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime news, Jalgaon, Shocking video viral

पुढील बातम्या