कांदिवली, 3 डिसेंबर : वारंवार सुरू असलेल्या आत्महत्यांच्या (Sucide) घटनांमुळे अख्खा देश हादरला आहे. अशातच मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील कांदिवली (Kandivali) येथे एका कुटुंबातील तिघांची आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
हे कुटुंब कांदिवली पश्चिमेकडील खान गल्ली, लालजी पाडा, गरुडा पेट्रोल पंप समोर, गणेशनगर येथे राहत होते. या ठिकाणी अजगर अली जब्बार अली (वय- 45 वर्षे) यांनी दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला. मिळालेल्या माहितीनुसार 45 वर्षीय व्यक्तीबरोबरच त्यांची 13 वर्षीय मुलगी कोनेंन आणि 9 वर्षीय सुजैन यांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. तरी घटनास्थळी कांदिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी हजर असून अधिक तपास सुरू आहे.
हे ही वाचा-Instagram वर फक्त एक फोटो पडला महागात; ट्रोल नाही तर उद्ध्वस्त झाली मॉडेल
अधिक मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळावर एक सुसाइड नोट मिळाली आहे. यामध्ये आत्महत्येचं कारण कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. तरी अद्याप याबाबत अधिक तपास केला जात आहे. मृत व्यक्तीने कोणाकडून कर्ज घेतले होते, याबाबत कोणी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते का? यानुसारही तपास केला जाणार असल्याचे सांगितले आहे.