मेट्रो सिटीमधला धक्कादायक प्रकार; आंतरजातीय प्रेमातून तरुणाची हत्या, 10 जणांकडून बेदम मारहाण

मेट्रो सिटीमधला धक्कादायक प्रकार; आंतरजातीय प्रेमातून तरुणाची हत्या, 10 जणांकडून बेदम मारहाण

पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब समोर आली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : दिल्लीतील आदर्श नगरमधील एका तरुणाला इतकं मारलं इतकं मारलं की त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांसह 5 जणांना अटक केली आहे. सांगितले जात आहे की मृत राहुल याचं आरोपींच्या बहिणीवर प्रेम होतं. ज्याला मुलीच्या कुटुंबीयांनी विरोध केला होता. दोघेही वेगवेगळ्या जातीचे आहेत.  7 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या उत्तर पश्चिमी भागातील आदर्श नगरमधील मूलचंद कॉलनीत राहणारे 18 वर्षीय राहुलला काही जणांनी ट्यूशनचं कारण देत बोलावलं.  पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल जात असल्याचे दिसून आले आहे.

त्यानंतर काही अंतरावर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला इतकं मारलं की त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना राहुलच्या मृत्यूची बातमी जगजीवन राम रुग्णालयातून मिळाली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दिल्यानुसार आतड्यांना दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तपासानंतर राहुल याचा मृत्यू प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा-मंदिराबाहेर पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; गावकऱ्यांचा विरोध करणं जीवावर

विजयंता आर्या यांनी सांगितले की, हा प्रकार 2 कुटुंबीयांमधील आहे. यामध्ये कारवाई करण्यात आली असून याचा तपास सुरू आहे. हत्या प्रकरणात किती जणांचा सहभाग होता याची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. हिंदू सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी सांगितेल की, मी आज राहुल राजपूत याच्या कुटुंबीयाची भेट घेण्यासाठी आदर्श नगर येथे जाईन. हिंदू सेना सर्व आरोपींच्या अटक आणि लवकर कारवाईसह 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करीत आहे. राहुलच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की त्याला 8 ते 10 जणांनी मारहाण केली व त्याच त्याचा मृत्यू  झाला. राहुल बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता, शिवाय तो घरात ट्यूशनही घेत होता.

Published by: Meenal Gangurde
First published: October 10, 2020, 3:33 PM IST
Tags: delhi

ताज्या बातम्या