ग्वाल्हेर, 24 डिसेंबर : एक तरुणीने आपल्या प्रियकरासाठी टॉयलेटमध्ये जाऊन विष ( poison ) घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बातमी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. ही तरुणी प्रियकरासोबत फरार झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. या अल्पवयीन मुलीला आपल्या प्रियकरासोबत राहायचे होते, मात्र आई-वडिलांचा विरोध असल्याने दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही मुलीचे प्रेमप्रकरण सुरूच होते.
बहोडापूर पोलील ठाणे क्षेत्रात मोतीझीलजवळ राहणारी अल्पवयीन मुलगी त्याच भागात राहणाऱ्या रिंकू जाटवसोबत प्रेम करत होती. तरुणी 13 डिसेंबर रोजी एका नातेवाईकांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बहोडापूर येथे आली होती. येथून रिंकू तिला आग्रा आणि नंतर दिल्लीला घेऊन गेला. यादरम्यान तरुणीचं लोकेशन पोलिसांना सापडलं. पोलिसांनी तरुणीचा शोध घेतला. तर दुसरीकडे बहोडापूर पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दाखल केली. मुलगी सापडल्यानंतर तिचे आई-वडील पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र आई-वडिलांसमोर मुलगी रिंकूसोबत राहण्याचा हट्ट करू लागली. याशिवाय रिंकूवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये असंही सांगत होती. मात्र मुलीचे आई-वडील तिचं ऐकण्यास तयार नव्हते.
टॉयलेटमध्ये खाल्ल विष
रागाच्या भरात मुलीने पोलीस ठाण्याच्या टॉयलेटमध्ये जाऊन विष खाल्ल. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर ठाणे परिसरात एकच गोंधळ उडाला. मुलीच्या या कृत्यामुळे तिचे आई-वडिलही घाबरले आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर गेले. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीला तातडीने रुग्णालयात हलवले. मुलीची प्रकृती स्थिर आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.