धक्कादायक! बहाण्याने मुलांना गच्चीवर घेऊन गेली महिला; एक-एक करीत पाच जणांना खाली फेकलं

धक्कादायक! बहाण्याने मुलांना गच्चीवर घेऊन गेली महिला; एक-एक करीत पाच जणांना खाली फेकलं

या पाच जणांपैकी तीन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

झारखंड, 2 नोव्हेंबर : झारखंडमधील साहिबगंजमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रविवार घडलेल्या या घटनेमुळे या भागातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. येथे एका महिलेने आपल्या दोन मजल्याच्या गच्चीवरुन एक-एक करीत सर्व मुलांना खाली फेकून दिलं. ज्यामध्ये दोन बालकांसह एक मुलगा जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बिहारी लाल मंडळ भवनाच्या जवळपास काही मुलं टिव्ही पाहत होते. घरातील एक महिला मुलांना बहाण्याने गच्चीवर घेऊन गेली. त्यानंतर सर्वांना गच्चीवर खाली फेकून दिलं. त्यावेळी बुधन मंडल आणि शर्मिला नावाच्या एका तरुणीने अनेक मुलांना खाली झेलून वाचवलं. यामध्ये अंश कुमार मंडल (12) आणि आयुष कुमार (10) गंभीर जखमी झाले आहेत. मुलांना वाचवताना बुधन मंडलही जखमी झाले आहेत. तिघांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, येथे 10 मुलं खेळत होती, त्यापैकी 5 जणांना महिलेने गच्चीवरुन खाली फेकून दिलं. या प्रकरणाची माहिती मिळताच विजय आशीष कुजूर व नगर ठाण्याचे एएसआय प्रमोद कुमार घटनस्थळी गेले व तपास केला. सांगितले जात आहे की या महिलेची मानसिक स्थिती ठीक नाही.

हे हीवाचा-क्रौर्याची सीमा ओलांडली! 90 वर्षांच्या वृद्ध महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधूनही एक धक्कादायक बातमी समोर आली होती. येथे एका कॉन्स्टेबलने दीड वर्षांच्या मुलीला अत्यंत वाईट वागणूक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी त्या दीड वर्षांच्या मुलीला बाबा म्हणायला सांगत होता. यासाठी तो बाळावर जबरदस्ती करू लागला. बाळ बाबा म्हणत नसल्याचे पाहून त्याने मुलीला सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर तो तेथून फरार झाला.

Published by: Meenal Gangurde
First published: November 2, 2020, 7:29 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या