जयपूर, 22 फेब्रुवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) कोटामध्ये 14 वर्षीय अल्पवयीन हत्या प्रकरणात पोलिसांनी हत्या प्रकरणात खुलासा करण्याची शक्यता आहे. ट्यूशन टीचरचं अल्पवयीन मुलीसोबत एकतर्फी प्रेम करीत होता. ज्या दिवशी शिक्षकाने अल्पवयीन मुलीसमोर प्रेम जाहीर केलं, त्यावेळी मुलीने नकार दिला होता. यामुळे रागाच्या भरात गौरव जैनने हत्या केली होती. पोलिसांनी गौरवला गुरूग्राम येथून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा गौरवला हत्येचं कारण विचारलं तर त्याने कारण सांगण्यात नकार दिला. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी झाली होती. आरोपी टीचर गेल्या 3 वर्षांपासून विद्यार्थिनीला शिकवित होता. दरम्यान विद्यार्थिनीवर आरोपीचा जीव जडला होता. हा आरोपी सायको होता. 13 फेब्रुवारी रोजी त्याने विद्यार्थिनीला ट्यूशनसाठी बोलावलं होतं. 15 फेब्रुवारी रोजी विद्यार्थिनीचा गणिताचा पेपर होता. त्यामुळे विद्यार्थिनी चिंतेत होती. आणि ट्यूशनसाठी गेली होती.
यावेळी आरोपीने विद्यार्थिनीकडे प्रेमाची कबुली दिली. मात्र विद्यार्थिनीने यास नकार दिला. मात्र यानंतर आरोपीचं स्वत:वरील नियंत्रण सुटलं. त्याने तेथेच विद्यार्थिनीची हत्या केली. त्याने गळा दाबून विद्यार्थिनीची हत्या केली. त्याने रशीने तिचे हात-पाय बांधून घेतले. गळ्याभोवतीही रशीने गळफास लावला.
हे ही वाचा-अपरात्री चिमुकलीचं अपहरण करून शेतात लपला नराधम; शेतकऱ्यानं एकरभर उसाला लावली आग
यानंतर आरोपी आपल्या खोलीला टाळं लावून फरार झाला. आरोपीने हत्येनंतर पळ काढण्यासाठी प्लानिंग केली. त्याने विद्यार्थिनीला फोन करून सांगितलं की, एक्स्ट्रा क्लासमुळे विद्यार्थिनी एक वाजेपर्यंत ट्यूशनमध्ये राहील. त्यावेळी मुलीचे पालक तिला घेण्यासाठी 1 वाजता घरी पोहोचले. तोपर्यंत आरोपी स्कूटी घेऊन फरार झाला होता. आरोपीच्या तपासासाठी 8 दिवसांपर्यंत टीम शोध घेत होती. आरोपीला अटक करण्यासाठी एक हजरांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपास्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder